मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kathua attack : २ महिन्यात २ मुले गमावली! कठुआ हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या कुटूंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

Kathua attack : २ महिन्यात २ मुले गमावली! कठुआ हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या कुटूंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

Jul 09, 2024 11:00 PM IST

Kathua terrorist attack : कठुआ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात रायफलमन आदर्श नेगी (वय २६) शहीद झाले आहेत. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी लेह येथे त्यांचे चुलत भाऊ मेजर प्रणय नेगी यांनाही वीरमरण आले होते.

शहीदांना मानवंदना देताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी  (ANI Photo)
शहीदांना मानवंदना देताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (ANI Photo)

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान हुतात्मा झाले होते.  शहीद झालेल्या पाच जवानांपैकी रायफलमन आदर्श नेगी (२६) यांचा चुलत भाऊही दोन महिन्यापूर्वी लेहमध्ये शहीद झाला होता. आदर्शचा चुलत भाऊ मेजर प्रणय नेगी (३३) यांनाही वीरमरण आले होते. 

ट्रेंडिंग न्यूज

देशसेवा करताना एक मुलगा आम्ही आधीच गमावला होता. कठुआ येथे झालेल्या हल्ल्यात आदर्शसह पौडी-गरवाल भागातील पाच जवान शहीद झाल्याची माहिती आदर्शचे काका आणि मेजरचे वडील बलवंतसिंग नेगी यांनी मंगळवारी दिली.

 या हल्ल्यात मृत्यू झालेले पाचही जवान उत्तराखंडचे होते. रायफलमन आदर्श नेगी यांच्यासह ज्युनिअर कमिशन ऑफिसर (नायब सुभेदार) आनंद सिंग, कमल सिंग (हवालदार), अनुज नेगी (रायफलमन) आणि विनोद सिंग (नाईक) अशी त्यांची नावे आहेत.

दरम्यान, आदर्शचे वडील दलबीर सिंग नेगी यांनी या  हल्ल्याच्या एक दिवस आधी रायफलमनशी झालेल्या शेवटच्या संभाषणाची आठवण सांगितली.

आम्ही रविवारी त्यांच्याशी शेवटचे बोललो. जेवण करून ड्युटीला जात असल्याचे त्याने सांगितले. तो एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी गावात आला होता आणि मार्चमध्ये निघून गेला होता, असे वडिलांनी माध्यमांना सांगितले.

गावातील ग्रामस्थ  व शेतकरी दलबीरसिंग नेगी यांनी सांगितले की, आदर्श अतिशय हुशार मुलगा होता आणि त्याने गावातील सरकारी शाळेतून इंटरमीडिएट चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने गढवाल विद्यापीठातून बीएस्सीचे शिक्षण घेतले. तो नेहमीच तंदुरुस्त होता आणि मी त्याला शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास सांगितले, ज्यामुळे तो सैन्यात भरती झाला आणि त्याने आता देशासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे.

दोन महिन्यांत दोन मुले गमावल्याचे सांगत गढवाल आणि कुमाऊंमधील मुले अनेकदा हुतात्मा म्हणून परत येत असल्याने सरकारने काही कठोर पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केली.

२०१८ मध्ये गढवाल रायफल्समध्ये दाखल झालेले रायफलमन आदर्श नेगी यांच्या पश्चात आई-वडील, दोन मोठी भावंडं, एक बहीण आणि एक भाऊ असा परिवार आहे. हे कुटुंब उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यातील थाटी डागर गावचे रहिवासी आहेत.

WhatsApp channel