Viral Video: श्रीरामाचा अनोखा भक्त, थेट पाठीवर गोंदवून घेतलं अयोध्यातील मंदीर; पाहा व्हिडिओ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: श्रीरामाचा अनोखा भक्त, थेट पाठीवर गोंदवून घेतलं अयोध्यातील मंदीर; पाहा व्हिडिओ

Viral Video: श्रीरामाचा अनोखा भक्त, थेट पाठीवर गोंदवून घेतलं अयोध्यातील मंदीर; पाहा व्हिडिओ

Feb 03, 2024 04:12 PM IST

Ram temple Tattoo: श्रीराम भक्ताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Ayodhya Ram Temple
Ayodhya Ram Temple

Ram temple Tattoo Viral Video: अयोध्येतील राम मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले झाल्याने देश-विदेशातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. २२ जानेवारीला रामलल्लाच्या अभिषेकवेळी हजारो लोकांचा जमाव अयोध्येत पोहोचला होता. पण जे लोक अयोध्येला पोहोचू शकले नाहीत, त्यांनीही आपले घरपरिसर सजवून रामलल्लाचे स्वागत केले. सध्या सोशल मीडियावर अनोख्या राम भक्ताचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात त्याने चक्क पाठीवर राम मंदीर गोंदवून घेतले आहे. या तरुणाची भक्ती पाहून अनेकजण थक्क झाले.

@ranjeet_rajak_15 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. २२ जानेवारीला शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या प्रयत्नाबद्दल अनेक जण त्या व्यक्तीचे कौतुक करताना दिसत आहेत. तर, अनेकजण त्याच्या पाठीवर श्रीरामाचे चित्र बनवल्याबद्दल संताप व्यक्त करत आहेत.

या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने म्हटले आहे की, तुम्ही श्रीरामाचे भक्त आहात पण भक्ती दाखवण्यासाठी अशा काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. तर, दुसऱ्या युजरने संबंधित तरुणाला सल्ला देताना असे म्हटले आहे की, जर तुम्हाला देवासाठी काही करायचे असेल तर त्यांचे उद्देश,विचार आणि वागणूक आत्मसात करावी. त्यांचा फोटो अंगावर गोठवून काहीच उपयोग नाही.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर