Ganesh Chaturthi 2023 : दोन कोटींच्या नोटा अन् ५० लाखांची नाणी; लाडक्या बाप्पाची अनोखी सजावट, पाहा VIDEO
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ganesh Chaturthi 2023 : दोन कोटींच्या नोटा अन् ५० लाखांची नाणी; लाडक्या बाप्पाची अनोखी सजावट, पाहा VIDEO

Ganesh Chaturthi 2023 : दोन कोटींच्या नोटा अन् ५० लाखांची नाणी; लाडक्या बाप्पाची अनोखी सजावट, पाहा VIDEO

Published Sep 19, 2023 02:55 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : भाविकांनी वेगवेगळ्या पद्धतीने बाप्पाचं स्वागत केलं आहे. विविध क्लृप्त्या आणि पद्धती वापरत गणरायाच्या मूर्त्यांची खरेदी करण्यात आली आहे.

Ganesh Chaturthi 2023 Bangalore
Ganesh Chaturthi 2023 Bangalore (ANI)

Ganesh Chaturthi 2023 Bangalore : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणरायाचं स्वागत करण्यात आलं आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरू या शहरांमध्ये भाविकांनी सुंदर आणि आकर्षक गणेशमूर्तीची खरेदी करत उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. बाप्पाचा मखर सुंदर आणि आकर्षक असावा, यासाठी असंख्य भाविक प्रयत्न करत असतात. कर्नाटकातील एका भाविकाने चक्क नोटांच्या मखरामध्ये गणपती बाप्पाला बसवलं आहे. दोन कोटी रुपयांच्या नोटा आणि ५० लाख रुपयांच्या नाण्यांचा वापर करत आकर्षक गणरायाला तयार करण्यात आलं आहे. या गणपती बाप्पाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बंगळुरुतील मंदिरात अडीच कोटी चलनाचा वापर करत गणपती बाप्पाची मूर्ती तयार करण्यात आली आहे. बंगळुरुच्या पुत्तेनहल्लीतील श्री सत्य गणपती मंदिरात या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यानंतर आता या गणपतीला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

बाप्पाच्या भाविकाने १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि २०० च्या नोटांचा वापर करत गणपतीची मूर्ती तयार करण्यात आली आहे. तसेच ५० लाख रुपयांची नाणी देखील या गणेशमूर्तीच्या निर्माणावेळी वापरण्यात आली आहे. त्यानंतर मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बंगळुरुतील या खास गणपतीवर लक्ष ठेवण्यासाठी २४ तास तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. तब्बल १५० ते २०० स्वयंसेवकांच्या मदतीनं या अनोख्या गणपतीची मूर्ती तयार करण्यात आली आहे. त्यामुळं सोमवारी सकाळ पासूनच गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात तोबा गर्दी केली आहे. पूजेसाठी देखील सकाळी आणि संध्याकाळी लोक मंदिरात येत आहे. त्यामुळं आता या अनोख्या आणि महागड्या गणपतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर