nirav modi news update : लंडन हायकोर्टाने फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला शुक्रवारी मोठा दणका दिला. मोदी विरोधात निकाल देतांना न्यायालयाने बँक ऑफ इंडियाला (बीओआय) ८ दशलक्ष डॉलर्स (६६ कोटी रुपये) भरण्यास सांगितले आहे. नीरव मोदीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. बँक ऑफ इंडियाने नीरवच्या दुबईस्थित कंपनी फायरस्टार डायमंड एफझेडईकडून ८ दशलक्ष डॉलर्स वसूल करण्यासाठी लंडन उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावर न्यायालयाने निकाल दिला आहे.
बँक ऑफ इंडियाने मोदींच्या दुबईस्थित कंपनी फायरस्टार डायमंड एफझेडईकडून ८ दशलक्ष डॉलर्स वसूल करण्यासाठी लंडन उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या विरोधात लंडन कोर्टाने दिलेला हा निर्णय नीरव मोदीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयामुळे बँक ऑफ इंडियाला दुबईस्थित कंपनीकडून वसुलीची कार्यवाही सुरू करता येईल आणि मोदींच्या संपत्तीचा जगात कुठेही लिलाव करता येणार आहे. नीरव मोदी सध्या ब्रिटनमधील थेमसाइड तुरुंगात बंद आहे.
न्यायमूर्तींनी निकाल देतांना म्हटले की, नीरवच्या खटल्यात योग्यता नाही आणि तसेच तो जिंकणार देखील नाही. त्यामुळे या खटल्याची सुनावणी करण्याची गरज नाही. ही ६६ कोटी रुपयांची थकबाकी बँकेने नीरव मोदीला दिलेल्या क्रेडिट सुविधेतून केली आहे. या ८ दशलक्ष पैकी ४ दशलक्ष डॉलर्स हे कर्ज रूपी घेतलेली रक्कम आहे. आणि त्यावरचे व्याह हे ४ दशलक्ष डॉलर्स आहे.
बँक ऑफ इंडियाने नीरव मोदीच्या फायरस्टारला ९ दशलक्ष डॉलर्स कर्ज दिले होते, परंतु जेव्हा बँकेने २०१८ मध्ये त्याचे पैसे परत मागितले तेव्हा मोदी हे पैसे परत करू शकला नाही. फायरआर्म डायमंड एफझेडई दुबईमध्ये असल्याने, यूके न्यायालयाचा सारांश निकाल तेथे अधिक सहजपणे लागू केला जाऊ शकतो. मोदी हे फायरस्टार एफझेडईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि हमीदार होते.