ठरलं तर.. २०२४ ला देशात INDIA विरुद्ध NDA सामना! पंतप्रधान मोदींविरोधात अखेर विरोधकांची एकजूट.. वाचा सविस्तर
Opposition Meeting : विरोधकांच्या महाआघाडीच्या नावावर चर्चा झाली असूनINDIA या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
Opposition Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला रोखण्यासाठी बंगळुरू येथे विरोधकांच्या बैठकीत रणनिती ठरवण्यात आली. या बैठकीत विरोधकांच्या महाआघाडीच्या नावावर चर्चा झाली असून INDIA या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या आघाडीचं नावINDIA ठेवण्याचा प्रस्ताव राहुल गांधी यांनी मांडला असूनत्यांच्या या कल्पकतेच प्रचंड कौतुक करत सर्व पक्षांनी याला अनुमोदन देत आगामी लोकसभा निवडणूक INDIA या नावाखाली लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याची घोषणा काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत केली.
ट्रेंडिंग न्यूज
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला नमवण्यासाठी देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या पक्षांची संयुक्त बैठक आज बंगळुरू येथे पार पडली. देशभरातील २६ पक्ष या बैठकीला हजर होते.
इंडिया जिंकणार भाजप हारणार - ममता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, ही एक चांगली आणि अर्थपूर्ण बैठक आहे. आज झालेल्या चर्चेनंतरचा निकाल या देशातील लोकांसाठी योग्य असू शकतो. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत बोलताना'सर्वजण मिळून भाजपचा पराभव करू' असा विश्वास व्यक्त केला.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, काँग्रेसला सत्तेचा भूक नाही किंवा पंतप्रधानपदात रस नाही. आपली राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय यांचे रक्षण करण्याचा आमचा हेतू आहे. तसेच राज्य पातळीवर विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत. मात्र हे मतभेद विचारधारेशी संबंधित नाहीत, असे खरगेंनी स्पष्ट केले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ (INDIA) असे नाव देण्यात आले आहे. India या संक्षिप्त रुपाचा पूर्ण अर्थIndian National Democratic Inclusive Alliance असा होतो. या नावाची अधिकृत घोषणा खर्गे यांनी केली आहे.
दरम्यान, मंगळवारी (१८ जुलै) दिल्ली येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्षांची (NDA) बैठक होणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत NDAआणि INDIA यांच्यात टफ फाईट होण्याची शक्यता आहे.
विभाग