Maratha Community : मराठा समाज वाराणसीतून मोदींच्या विरोधात १ हजार उमेदवारी अर्ज भरणार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Maratha Community : मराठा समाज वाराणसीतून मोदींच्या विरोधात १ हजार उमेदवारी अर्ज भरणार

Maratha Community : मराठा समाज वाराणसीतून मोदींच्या विरोधात १ हजार उमेदवारी अर्ज भरणार

Mar 05, 2024 10:41 PM IST

Maratha Community And narendra modi : मराठा समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात शड्डू ठोकला असून परभणीतील मराठा समाज वाराणसी मतदारसंघात १ हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहे.

मराठा समाजाने नरेंद्र मोदींविरोधात ठोकला शड्डू
मराठा समाजाने नरेंद्र मोदींविरोधात ठोकला शड्डू

Loksabha and Maratha Community : मराठा समाजाने नरेंद्र मोदींविरोधात शड्ड ठोकला असून वाराणसीतून १ हजार उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. यात मराठा समाजाबरोबरच अन्य समाजातील लोकांनीही अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज आरक्षणावरून आक्रमक झाला असून महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे.

लोकसभा उमेदवारीबाबत मराठा समाजाच्या बीड व नांदेड जिल्ह्यात बैठका पार पडल्या असून आता परभणीत झालेल्या बैठकीत मराठा समाजाकडून महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मराठा समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात शड्डू ठोकला असून परभणीतील मराठा समाज वाराणसी मतदारसंघात १ हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहे. याचा ठराव समाजाकडून मंजूर करण्यात आला आहे

आज परभणीतील मराठा समाजाची शहरातील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला विविध संघटनाचे पदाधिकारी, मराठा बांधव मोठ्या संख्येने उपास्थित होते. या बैठकीत ठराव करण्यात आला की, जिल्ह्यातील एक हजार मराठा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वाराणसी पाठोपाठ राहुल गांधी प्रतिनिधीत्व करणाऱ्या मतदारसंघात, बारामती आणि ठाणे मतदारसंघात मराठा समाज बांधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राज्य सरकारने सगेसोयरे दाखल्यांची अंमलबजावणी झाली नसल्यास प्रत्येक मतदारसंघात २ हजार उमेदवार उभे करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच यांच्याबरोबरच राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातही मराठा समाज उमेदवार उभे करणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर