Rahul Gandhi On PM Modi: मोदींकडून लोकसभा निवडणुकीसाठी 'मॅच फिक्सिंग'; राहुल गांधींचा घणाघात-loksabha election 2024 india alliance rally in ramlila maidan rahul gandhi criticised pm narendra modi over arvind kejri ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi On PM Modi: मोदींकडून लोकसभा निवडणुकीसाठी 'मॅच फिक्सिंग'; राहुल गांधींचा घणाघात

Rahul Gandhi On PM Modi: मोदींकडून लोकसभा निवडणुकीसाठी 'मॅच फिक्सिंग'; राहुल गांधींचा घणाघात

Mar 31, 2024 07:13 PM IST

Rahul Gandhi criticised PM Modi: इंडिया आघाडीच्या महासभेत काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला.

इंडिया आघाडीच्या महासभेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.
इंडिया आघाडीच्या महासभेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

INDIA Alliance Rally in Ramlila Maidan: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची रामलीला मैदानावर महासभा पार पडली. या सभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाला साधला आहे. क्रिकेटमध्ये अंपायर, खेळाडूंना विकत घेऊन किंवा कर्णधाराला घाबरून मॅच जिंकल्या जातात, तसाच काही प्रकार लोकसभा निवडणुकीपूर्वी पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करण्यात आली. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा विरोधापक्ष आहे. निवडणुकीपूर्वी आमचे सर्व बँक खाते बंद करण्यात आले. आम्हाला प्रचाराला सुरुवात करायची आहे, पोस्टर लावायचे आहेत. मात्र, सर्व स्त्रोत बंद करण्यात आले. मग ही निवडणूक कशी होत आहे? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. सध्या आयपीएलचे सामने सुरू आहेत. क्रिकेटमध्ये अंपायर, विरोधी संघातील खेळाडू आणि कर्णधारावर दबाव टाकून सामने जिंकले जातात, याला मॅच फिक्सिंग असे म्हटले जाते. लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशातही अशाच प्रकार सुरू आहे. नरेंद्र मोदी यांनी अंपायर निवडल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

कल्पना सोरेन आणि सुनीता केजरीवाल या आमच्या बहिणी आहेत, ज्या हुकूमशाही सरकारच्या विरोधात लढत आहेत, मग आमच्यासारखे भाऊ मागे कसे राहतील. मी भाजपाला आव्हान देतो की, जो पक्ष भाजपासोबत आहे तो ईडी, सीबीआय आणि आयटी आहे, असे बॅनर लावावे, असे उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर टीका केली.

 

कोणकोणते नेते उपस्थित?

इंडिया आघाडीच्या महासभेला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारसह फारूक अब्दुल्ला, सिताराम येचूरी, डी. राजा, राहुल गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, सुनिता केजरीवाल, एमके स्टॅलिन, चंपई सोरेन, कल्पना सोरेन यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.