OM Birla : विदेशातील दौरा अर्धवट सोडून लोकसभेचे अध्यक्ष मायदेशात परतणार, अचानक नेमकं काय घडलं?
OM Birla Lok Sabha : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे दोन देशांचा दौरा अर्धवट सोडून तातडीनं भारतात परतणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Lok Sabha Speaker OM Birla Manama Bahrain Visit : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे सध्या मनामा आणि बहरीन या दोन देशांच्या दौऱ्यावर गेलेले आहेत. आयपीयूच्या एका कार्यक्रमाला बिर्ला संबोधित करणार असतानाच आता त्यांनी दोन्ही देशांचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमधील ओम बिर्ला यांचा नियोजित दौरा १५ मार्चपर्यंत होता. परंतु ते येत्या १२ मार्चलाच भारतात परतणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता लोकसभा अध्यक्षांनी त्यांना विदेश दौरा संपवून तातडीनं भारतात परतण्याचा निर्णय घेतल्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर आता ते भारतात का परतत आहे, याचंही कारण समोर आलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
गेल्या ३१ जानेवारीपासून संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली होती. हे अधिवेशन येत्या ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिलं सत्र संपलेलं असून दुसरं सत्र १३ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळं अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी संसदेत लोकसभा अध्यक्षांची उपस्थिती असणं अनिवार्य असते. त्यामुळंच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विदेशातील दौरा अर्धवट सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. अर्थसंकल्पाच्या पहिल्या सत्रात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला असून दुसऱ्या सत्रात भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधीत इतर विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यावेळी सभागृहातील कामकाज चालवण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला भारतात परतणार आहेत.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे मनामामधील भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. याशिवाय तेथील २०० वर्ष जुन्या श्रीनाथजी मंदिरात पूजा करणार आहेत. त्यानंतर आयपीयूच्या एका सामान्य चर्चासत्रात ओम बिर्ला भाग घेणार आहेत. त्यामुळं आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे १२ मार्चला भारतात परतणार आहेत. त्यानंतर १३ मार्चला ते संसदेतील कामकाजात सहभागी होतील.