मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mood of the Nation : मोदींची ३७० जागांची भविष्यवाणी खरी ठरणार? हिंदी पट्ट्याची BJP ला साथ, पाहा सर्व्हेची आकडेवारी

Mood of the Nation : मोदींची ३७० जागांची भविष्यवाणी खरी ठरणार? हिंदी पट्ट्याची BJP ला साथ, पाहा सर्व्हेची आकडेवारी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 08, 2024 06:07 PM IST

Lok sabha 2024 Opinion Poll : नुकत्याच आलेल्या सर्व्हेनुसार भाजप हिंदी पट्ट्यातील १० राज्यात २०० हून अधिक जागा जिंकण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर गुजरात व महाराष्ट्रातील विजयी जागांसोबत बहुमत गाठू शकते. पाहुयात हिंदी भाषिक राज्यनिहाय भाजपच्या जागा..

Lok sabha 2024 Opinion Poll
Lok sabha 2024 Opinion Poll

लोकसभा निवडणूक २०२४ ची घोषणा होण्यास अद्याप जवळपास एक महिन्याचा अवधी शिल्लक आहे. मात्र भारतीय जनतेचा कल एका सर्व्हेक्षणातून समोर आला आहे. एप्रिल-मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुका पार पडणार असून सांगितले जात आहे की, एकूण सात टप्प्यात या निवडणुका घेतल्या जातील. दरम्यान वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांचे सर्व्हे समोर येत आहेत. यानुसार राम मंदिर असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये भाजप पुन्हा एकदा मुसंडी मारू शकते. येथे भाजपचे व्होट शेअरही ५० टक्के राहील तसेच जवळपास ७० हून अधिक जागा जिंकू शकते. त्याचबरोबर भाजपचा सहयोगी 'अपना दल' २ जागांवर विजय मिळवू शकतो. सपाच्या खात्यात केवळ ७ व काँग्रेसला २ जागांवर समाधान मानावे लागणार आहे.

तसेच टाइम्स नाउ चॅनलच्या सर्व्हेनुसार बिहारमध्ये नितीश कुमारांच्या एंट्रीने एनडीएला फायदा मिळेल. मात्र २०१९ पेक्षा एनडीएच्या कमी जागा येतील. सर्वेनुसार एनडीएला बिहारमध्ये ३५ जागा मिळू शकतात. तसेच आरजेडी,  काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये एकूण ४० लोकसभा जागा आहेत. इंडिया टुडेच्या 'मूड ऑफ द नेशन' सर्वेनुसार भाजप हिंदी पट्टा संबोधल्या जाणाऱ्या १० राज्यात मोठी आघाडी घेऊ शकते. गायी पट्ट्यात भाजप २०५ जागा मिळवू शकतो. 

या राज्यांमध्ये यूपी, बिहार, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान,  छत्तीसगड, झारखंड,  हिमाचल आणि उत्तराखंड आदि राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये भाजप २०० हून अधिक जागा मिळवू शकतो. त्याचबरोबर गुजरात व महाराष्ट्रातही भाजप चांगल्या स्थितीत दिसून येत आहे. गुजरातमध्ये २०१९ च्या निवडणुकीत भाजपने क्लीन स्वीप केले होते यावेळीही येथे काँग्रेस आधीपेक्षा कमजोर दिसत आहे. महाराष्ट्रातही शरद पवाराच्या हातातून पक्ष निसटला आहे तर उद्धव ठाकरेंची शिवसेनाही दोन गटात विभागली गेली आहे. भाजपच्या तुलनेत काँग्रेस कमजोर दिसत आहे. यामुळे ४८ जागांच्या राज्यात भाजप मजबूत स्थितीत दिसत आहे.

त्यामुळे जर महाराष्ट्र व गुजरातमध्ये जर भाजपला मोठे यश मिळाले तर केवळ १२ राज्यातील जागांवरच बहुमताचा जुगाड होणार आहे. त्यानंतर ओडिशा, बंगाल, जम्मू-काश्मीर, पंजाब,  तेलंगाणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यातील जागा भाजपसाठी बोनस ठरणार आहेत. सर्वेनुसार भाजपला ३०० हून अधिक जागा मिळू शकतात. 

हिंदी पट्ट्यातील कोणत्या राज्यात किती मिळणार जागा -

यूपी- ७२
बिहार- ३५
हरियाणा- ८
दिल्ली- ७
राजस्थान- २५
मध्य प्रदेश- २७
छत्तीसगढ़- १०
उत्तराखंड- ५
हिमाचल- ४
झारखंड- १२

 

दक्षिणेतील राज्यांचे पाहिले तर कर्नाटकात भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे. येथे भाजप आघाडीला २४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच तेलंगाणामध्ये तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपचे यावेळीही खाते उघडताना दिसत आहे.

WhatsApp channel