TheQuint Fact cheack : काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी एका हिंदी वृत्तपत्राचा स्क्रीनशॉट शेअर करत दावा केला आहे की भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana), माधवी लता (Madhavi Lata) आणि अजय टेनी तसेच काँग्रेसचे कन्हैया कुमार यांसारख्या अनेक नामांकित उमेदवारांचा लोकसभा निवडणुकीत पराभव हा १९७३१ मतांनी झाला. त्यांनी या बाबत ईव्हीएम मशीनला देखील दोष दिला आहे. मतदानादरम्यान वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) काही ‘सेटिंग्ज’ किंवा फेरफार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा दावा सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र, व्हायरल झालेला हा दावा खोटा आहे. द क्विंटने या बाबत फॅक्ट चेक केले असून यातून ही माहिती पुढे आली आहे.
नवनीत राणा व्यतिरिक्त, इतर सर्व उमेदवार ज्यांची नावे व्हायरल होणाऱ्या क्लिपिंगमध्ये आहेत त्यांचा ३० हजारांपेक्षा अधिकमतांच्या फरकाने पराभव झाला आहे.
व्हायरल क्लिपमध्ये पुढे आलेली माहिती तसेच आकडेवारी ही बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी द क्विंटने भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) वेबसाइटला भेट दिली.
तथापि, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात लढणाऱ्या माधवी लता यांचा हैदराबादमधून ३.३८ लाख मतांनी पराभव झाला.
तसेच उत्तर प्रदेशातील खेरी येथे समाजवादी पक्षाच्या उत्कर्ष वर्मा यांच्या विरोधात लढलेले भाजपचे अजय मिश्रा टेनी यांचा ३४,३२९ मतांनी पराभव झाला.
वृत्तपत्राच्या क्लिपिंगचा स्रोत द क्विंटला सापडू शकला नसला तरी तरी व्हायरल दाव्यात नमूद केलेली आकडेवारी खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निष्कर्ष: लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात वृत्तपत्राच्या क्लिपिंगसह सामायिक केलेल्या व्हायरल दाव्यात चुकीचे नमूद केले आहे की EVM मध्ये फेरफार करण्यात आला आहे ज्यामुळे उमेदवार केवळ १९,७३९ मतांनी पराभूत झाले आहेत.
डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात the quint ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.
संबंधित बातम्या