Lok Sabha Election Dates : लोकसभा निवडणुकीसाठी आता काही महिनेच शिल्लक आहेत. निवडणूक आयोग १३ मार्चनंतर कधीही लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करू शकते. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीसाठी आयोगाचे अधिकारी विविध राज्यांचा दौरा करत आहेत. ही तयारी पूर्ण झाल्यानंतर लोकसभा निवडणुकांची घोषणा केली जाईल.
लोकसभा निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून काय तयारी केली जात आहे, यासाठी आयोगाचे अधिकारी तामिळनाडू राज्याचा दौरा करत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी बिहारमधील तयारीचा आढावा घेतला होता. येत्या काही दिवसात उत्तर प्रदेश,जम्मू-कश्मीरव अन्य राज्यांचे दौरे केले जातील. हे दौरे १३ मार्चपूर्वी संपणार आहेत. त्यामुळे आयोग १३ मार्चनंतर कधीही लोकसभा निवडणुकीची घोषणा करू शकते.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विविध राज्यांमध्ये सध्या राज्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत नियमित बैठका घेतल्या जात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना काय अडचणी आहेत या जाणून घेतल्या जात आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स (EVM), सुरक्षा रक्षकांची गरज व अन्य गोष्टींचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी ९७ कोटी मतदार पात्र ठरले आहेत. यामध्ये ६ टक्क्यांनी नव्या मतदारांची वाढ झाली आहे. तसेच सुमारे २ कोटी नव मतदारांचाही यामध्ये समावेश आहे.
संबंधित बातम्या