LS Election Result: लोकसभेचा रणसंग्राम कोण जिंकणार? प्रतीक्षा संपली, लोकसभेच्या ५४३ जागांच्या निकालाचे काउंटडाउन सुरू
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  LS Election Result: लोकसभेचा रणसंग्राम कोण जिंकणार? प्रतीक्षा संपली, लोकसभेच्या ५४३ जागांच्या निकालाचे काउंटडाउन सुरू

LS Election Result: लोकसभेचा रणसंग्राम कोण जिंकणार? प्रतीक्षा संपली, लोकसभेच्या ५४३ जागांच्या निकालाचे काउंटडाउन सुरू

Jun 03, 2024 11:21 PM IST

Lok sabha election 2024 result : मंगळवारी लोकशाहीच्या उत्सवासाठी मोठा दिवस आहे. उद्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. ७ टप्प्यात ५४३ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीनंतर देशातील जनता निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यांची प्रतीक्षा संपणार असून मतमोजणीसाठी आता काही तासांचा अवधी राहिला आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ चा उद्या निकाल
लोकसभा निवडणूक २०२४ चा उद्या निकाल

Lok Sabha Elections Results :  लोकसभा निवडणूक २०२४ चा उद्या निकाल जाहीर होणार आहे. गेल्या ४४ दिवसांपासून सुरू असलेल्या या लोकशाहीच्या उत्सवाचे उद्या समापन होणार आहे. मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. उद्या देशातील ५१ पक्षांच्या ८३६० उमेदवारांच्या भविष्याचा फैसला होणार आहे. ५४३ जागांसाठी सात टप्प्यात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेचा निकाल उद्या एकाच दिवशी लागणार आहे. उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होणार की, देशाच्या सत्तेत कोण बसणार. 

एकीकडे सत्ताधारी एनडीए तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत जोरदार मुकावला होत आहे. दरम्यान सर्वच एक्झिट पोलमध्ये मोदी सरकार सत्तेत परत येत असल्याचे म्हटले आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातील पोस्टाच्या मतांची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम उघडले जातील. लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश आणि  ओडिशा विधानसभा निवडणुकीचा निकालही जाहीर होणार आहे.

२८ राज्ये व ८  केंद्र शासित प्रदेशातील सर्व ५४३ जागांसाठी सात टप्प्यात मतदान प्रक्रिया राबवली गेली. मतदान प्रक्रिया १ जून रोजी संपली. आता देशवासींना निकालाची उत्सुकता लागली आहे. 

एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येत आहे. मात्र एनडीए ४०० पार जाताना दिसत नाही. तीन एक्झिट पोलने एनडीएला ४०० च्या वर जागा दिल्या आहेत. तर बहुतांश संस्थांनी एनडीए ३५० पार जाणार असल्याचे म्हटले आहे. लोकसभेच्या एकूण ५४३ जागां असून बहुमतासाठी २७२ जागा आवश्यक आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर निवडणूक निकाल कसे पाहणार ?

विधानसभा मतदारसंघ/लोकसभा मतदारसंघातील रिटर्निंग ऑफिसर/सहायक रिटर्निंग ऑफिसर द्वारे नोंद केलेल्या डेटानुसार, मतमोजणीचे कल आणि परिणाम निवडणूक आयोगाची वेबसाइट https://results.eci.gov.in/  वर पाहू शकतो. 

htmarathi.in वरही पाहा क्षणा-क्षणाचे अपडेट

हिंदुस्तान टाईम्स मराठी न्यूज वेबसाइटवरही तुम्हाला लोकसभा निवडणूक निकालाचे क्षणा-क्षणाचे अपडेट मिळतील. महाराष्ट्रासह देशभरातील निवडणूक निकालाचे ताजे आकडे तुम्हाला मिळू शकतील. त्याचबरोबर एचटी मराठीच्या निवडणूक पेजवरही जाऊ शकता. येथे तुम्हाला महत्वाच्या जागांवरील विजयी व पराभत उमेदवार व पक्षाची संपूर्ण माहिती मिळेल.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर