मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Lok Sabha Election : निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद लाईव्ह, लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा

Lok Sabha Election : निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद लाईव्ह, लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 16, 2024 03:43 PM IST

द ok Sabha Election : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) कधी जाहीर होणार याची प्रतीक्षा आज संपणार आहे. निवडणूक आयोग (Election Commission of India) आज तारखा जाहीर करणार असून दुपारी ३ वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेतणार आहे.

Rajiv Kumar
Rajiv Kumar

Lok Sabha Election update : भारतीय लोकशाही जीवंत ठेवणारा महत्वाचा घटक असणाऱ्या लोकसभा निवडणुका कधी जाहीर होणार याची प्रतीक्षा अवघ्या देशाला होती. ही परीक्षा अखेर आज संपली आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा जाहीर करणार आहेत. या साठी आयोगाने विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून किती टप्प्यात निवडणुका घेतल्या जातील याची माहिती दिली जाणार आहे. या सोबतच विधानसभा निवडणुकीची देखील घोषणा केली जाणार का या कडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

Maharashtra Weather Update: भर उन्हाळ्यात छत्र्या बाहेर काढा! विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचे; 'या' जिल्ह्यांना अलर्ट

अवघ्या देशात निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. देशातील सर्व राजकीय पक्षांनी या साठी जय्यत तयारी केली आहे. निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याची प्रतीक्षा सर्वांना लागली होती. या संदर्भात निवडणूक आयोग कधी घोषणा करणार? या निवडणुका किती टप्यात होणार ? आचार संहिता कधी लागू होणार या कडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून होते. अखेर ही प्रतीक्षा आज संपणार आहे. निवडणूक आयोग लोकसभा निवडणूक २०२४ या कशा आणि किती टप्यात घेतील या बाबत घोषणा करणार आहेत. दरम्यान, आज पासून आचारसंहिता लागणार असून प्रचाराचा धुरळा आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाणार आहेत. राजकीय पक्ष पूर्ण ताकद लावून या निवडणुका लढणार आहेत.

Pune Susgaon fire: पुण्याच्या सुस गावात अग्नितांडव! ३ सिलेंडरचा स्फोटांमुळे कामगारांच्या झोपड्यांना आग!

राज्याच्या विचार केल्यास या निवडणुका महायुती आणि महावीकास आघाडी अशी होणार आहे. भाजपने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली असून अनेक नव्या चहऱ्यांना संधि दिली आहे. महावीकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यांच्या यादीकडे देखील सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणूका या ६ ते ७ टप्प्यात होऊ शकतात.

२०१९ मध्ये १० मार्च रोजी या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. ११ ते १९ मे या कालावधीत विविध टप्प्यात निवडणुका पार पडल्या होत्या. यात ६७.१ टक्के मतदान झाले होते. २३ मे रोजी मतमोजणी होऊन भाजप आणि मित्र पक्षांनी सत्ता स्थापन केली होती. भाजप ला ३०३, तर एनडीए ला ३५३ जागा मिळाल्या होत्या. तर कॉँग्रेस ला ५२ जागांवर समाधान मानावे लागले होए. या वर्षी देशातील तब्बल ९८ कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

IPL_Entry_Point