तमिलनाडू सरकारमधील मंत्री थिरु पोनमुडी मंगळवारी राज्यातील पूर प्रभावित भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र या दौऱ्यात संतप्त लोकांनी त्यांच्या चिखल फेकत आपला संताप व्यक्त केला. भाजपा नेता अन्नामलाई यांनी या घटनेचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटले की, हा जनतेचा आक्रोश असून आता त्यांची नाराजी बाहेर येत आहे.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अन्नामलाई यांनी लिहिले की, तामिळनाडूमध्ये सध्या अशी परिस्थिती बनली आहे. मुख्यमंत्री आणिउपमुख्यमंत्री चेन्नईच्या रस्त्यांवर फोटो काढण्यात व्यस्त आहेत जेथे पाऊस खूप कमी झाला. चेन्नई सोडून अन्य ठिकाणी काय होत आहे, याकडे त्यांचे लक्षच नाही. यावरून लोकांचा संताप बाहेर पडत आहे.
राज्यातील सत्ताधारी डीएमकेकडून याघटनेवर अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मंगळवारी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. फेंगल चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या विल्लुपुरम, कुड्डालोर आणि कल्लाकुरिची जिल्ह्तील कूंबाने २-२ हजार रुपयेआर्थिक मदत देण्याची घोषणा सरकारने केली आहे. राज्य चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली. विल्लुपुरम, कुड्डालोरआणि कल्लाकुरिची जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा कुटूंबांना रेशन कार्डाच्या आधारावर प्रत्येकी २ हजार रुपय़े दिले जातील. या जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत , कल्लाकुरिची, तिरुवन्नमलाई, कुड्डालोर, धर्मपुरी आणि कृष्णागिरी जिल्ह्यात पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या भागातील लोकांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय झाला. चक्रीवादळ व पूरामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना ५-५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकार नुकसानग्रस्त घरांसाठी १० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची, पूर्णपणे घर कोसळलेल्या लोकांना आवास योजनेच्या माध्यमातून घर बांधून देण्यास प्राधान्य देणे, शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त पिकांसाठी प्रति हेक्टेर १७ हजार रुपयांची मदत प्रदान करने, फळबागांसाठी प्रति हेक्टेर २२,५०० रुपये प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संबंधित बातम्या