जप्त केलेल्या ५० हजार रुपये किंमतीच्या दारूवर चालणार बुलडोझर, इतक्यात जमावाने लुटून नेल्या बाटल्या; पाहा VIDEO-locals steal them as police try to destroy liquor bottles with bulldozer video viral ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जप्त केलेल्या ५० हजार रुपये किंमतीच्या दारूवर चालणार बुलडोझर, इतक्यात जमावाने लुटून नेल्या बाटल्या; पाहा VIDEO

जप्त केलेल्या ५० हजार रुपये किंमतीच्या दारूवर चालणार बुलडोझर, इतक्यात जमावाने लुटून नेल्या बाटल्या; पाहा VIDEO

Sep 10, 2024 08:55 PM IST

पोलिसांनी जप्त केलेल्या ५० लाख रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या नष्ट करत असताना जमाव जमा होऊ लागला आणि मधावर मधमाशा जशा तुटून पडतात तसे ते दारूच्या बाटल्यांवर तुटून पडले.

पोलिसांनी जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या लोकांनी लुटून नेल्या
पोलिसांनी जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या लोकांनी लुटून नेल्या

आंध्र प्रदेशातील गुंटूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे,  ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजधानी अमरावतीपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंटूर मध्ये सोमवारी ही घटना घडली. पोलिसांनी जप्त केलेल्या ५० लाख रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या नष्ट करत असताना जमाव जमा होऊ लागला आणि ते दारूच्या बाटल्यांवर तुटून पडले,  जसे मधमाशा मधाच्या पोळ्यावर तुटून पडतात.

गुंटूरमधील एट्टुकुरू रोडवरील डम्पिंग यार्डमध्ये ही घटना घडली, जिथे पोलिस बुलडोझर चालवून जप्त केलेली दारू नष्ट करण्याच्या तयारीत होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पोलिसांनी दारूच्या बाटल्या नष्ट करण्यासाठी जमिनीवर ठेवल्या आहेत. इतक्यात  लोकांनी धक्काबुक्की करत दारूच्या बाटल्या पळवून नेल्या.  पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र अनेक जण दारूच्या बाटल्या घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

पोलिस "अरे... अरे... ' ओरडत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र लोक दारूच्या बाटल्या घेऊन पळून जात होते. मात्र, पोलिसांनी कोणावरही बळाचा वापर न करता त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि बाटल्या परत ठेवण्याचे आवाहन केले. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून दारू चोरणाऱ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात दारूने भरलेला मिनी ट्रक सोन नदीत कोसळला होता. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहडोल-रीवा रस्त्यावर रात्रीच्या सुमारास सोन नदीवरील पुलावरून मिनी ट्रक नदीत कोसळून ट्रकमधील दारूच्या बाटल्या पडल्या होत्या. दरम्यान, अनेक पादचाऱ्यांनी दारूच्या बाटल्या लुटल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दारू शहडोलहून  ब्योहारीकडे जात होती.

Whats_app_banner