भयंकर! समोस्यात बटाट्या ऐवजी निघाली मेलेली पाल! पाच वर्षांच्या मुलाची तब्येत बिघडली
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भयंकर! समोस्यात बटाट्या ऐवजी निघाली मेलेली पाल! पाच वर्षांच्या मुलाची तब्येत बिघडली

भयंकर! समोस्यात बटाट्या ऐवजी निघाली मेलेली पाल! पाच वर्षांच्या मुलाची तब्येत बिघडली

Nov 08, 2024 03:20 PM IST

lizard found inside samosa : मध्यप्रदेशातील रेवा येथे एका समोस्यात मेलेली पाल आढळली. हा समोसा खाल्ल्याने पाच वर्षांच्या मुलाची तब्येत खराब झाली आहे.

समोस्यात बटाट्या ऐवजी निघाली मेलेली पाल! पाच वर्षांच्या मुलाची तब्येत बिघडली
समोस्यात बटाट्या ऐवजी निघाली मेलेली पाल! पाच वर्षांच्या मुलाची तब्येत बिघडली

lizard found in samosa in rewa : काही दिवसांपूर्वी एका बियरमध्ये मेलेली पाल आढळली होती. ही घटना ताजी असतांना आता समोस्यात मेलेली पाल सापडल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील रेवा येथे उघडकीस आली आहे. हा समोसा खाल्ल्याने एका ५ वर्षांच्या मुलाची तब्येत बिघडली आहे. या मुलाला उलट्या होऊ लागल्या तसेच पोटात दुखू लागले. कुटुंबीयांनी त्याला संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याच्यावर उपचार केल्यावर या  मुलाची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळत आहे. मुलाच्या कुटुंबियांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात या प्रकरणी हॉटेल मालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.  पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

रेवा येथील एका हॉटेलमध्ये एक मुलगा त्याच्या वडिलांसोबत गेला होता. यावेळी त्याने हॉटेलमध्ये समोस्याची ऑर्डर दिली. मुलाने हा समोसा खाल्ला. त्याने हा समोसा खाताच त्यात त्याला मेलेली पाल आढळली. हा समोसा  खाल्ल्यानंतर मुलाची तब्येत बिघडली. या समोशाच्या आत बटाट्याऐवजी पाल असल्याचे आढळल्याने या मुलाला तातडीने उपचारासाठी रीवा येथील संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांची प्रकृती आता ठीक आहे.

ही घटना सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दीनदयाळ धाम पाडरा येथील असून रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरेश हॉटेलमध्ये मुलाने समोसा खाल्ला होता. रस्त्यावर असलेल्या या दुकानात मोठ्या प्रमाणात नागरिक येथील समोसा खाण्यासाठी गर्दी करत असतात.  

या घटनेनंतर लगेचच या प्रकरणी  हॉटेल मालकाला याची माहिती देण्यात आली.  मात्र,  त्यानंतरही या हॉटेलमध्ये भेसळयुक्त आणि खराब दर्जाचे पदार्थ विकले जात असल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे.  मुलाने समोशाच्या आत असलेली पाल अर्धवट खाल्ली होती. तर ही बाब लक्षात आल्यावर समोस्यात पालीचे डोके राहिले होते.  मुलाच्या कुटुंबियांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात हॉटेल मालकाविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर