Viral News : बडवाइजर बीयरच्या बॉटलमध्ये आढळली मेलेली पाल! तेलंगणातील धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : बडवाइजर बीयरच्या बॉटलमध्ये आढळली मेलेली पाल! तेलंगणातील धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

Viral News : बडवाइजर बीयरच्या बॉटलमध्ये आढळली मेलेली पाल! तेलंगणातील धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

Oct 28, 2024 02:38 PM IST

Viral News : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बडवायजर बियर बॉटलमध्ये चक्क पाल तरंगतान दिसत आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

बडवाइजर बीयरच्या बॉटलमध्ये आढळली मेलेली पाल! तेलंगानातील धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
बडवाइजर बीयरच्या बॉटलमध्ये आढळली मेलेली पाल! तेलंगानातील धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

Viral News : जर तुम्ही बियरचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. तेलंगणातील विकाराबाद मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बडवायजर  बिअरच्या बॉटलमध्ये चक्क पाल आढळली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.  या घटनेमुळे बियर पिणे सुरक्षित आहे का हा  प्रश्न निर्माण झाला आहे. अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या मानकांवर देखील  प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरेली गावातील लक्ष्मीकांत रेड्डी आणि अनंतय्या या दोघांनी धारूर येथील एका वाईन शॉपमधून सुमारे चार हजार रुपयांची दारू खरेदी केली होती. यातील बडवाझर कंपनीच्या बिअरची बाटली उघडली तेव्हा त्यात त्यांना पाल तरंगत असतांना दिसल्याने त्यांना मोठा धक्का बसला.  

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बडवायजर बियर कंपनीची बाटली हलवताना दिसत आहे. या बाटलीत एक मेलेली पाल तरंगतांना दिसत आहे.  या घटनेनंतर दोघांनीही स्थानिक प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. वाईन शॉप मालकाने या घटनेची जबाबदारी टाळत ही बाब दारू पुरवठादारावर ढकलली आहे.  

या बाबत बडवायजर  कंपनीकडून उत्तर मागितले आहे. कंपनीने या बाबत चौकशी करून त्या बाबत माहिती दिली जाईल असे म्हटलं आहे.  या घटनेपूर्वी भारतात अन्न सुरक्षेशी संबंधित आणखी एक घटना समोर आली होती. आयआरसीटीसीच्या व्हीआयपी एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये सर्व्ह करण्यात आलेल्या रायतामध्ये जिवंत गोम सापडल्याने खळबळ उडाली होती. य याप्रकरणी दिल्लीच्या आर्यांश सिंगला या व्यक्तिला मोठा धक्का बसला होता.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्याने या याबाबत फोटो शेअर केला आणि उपहासात्मकपणे "होय, भारतीय रेल्वेच्या  जेवणाची गुणवत्ता सुधारली आहे; आता ते जास्त प्रथिने घेऊन प्रवाशांना रायता सर्व्ह करत आहेत. आयआरसीटीसीने देखील ही घटना गेल्या महिन्यात घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच भविष्यात या प्रकारच्या घटना घडू नये यासाठी  आवश्यक ती पावले उचलण्यात आली असल्याचे निवेदन दिले होते. 

घटनेच्या वेळी सेवेतील कर्मचाऱ्यांनी तत्परतेने प्रतिसाद दिला असून सेवा पुरवठादारावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे, असेही प्रवक्त्याने सांगितले. आयआरसीटीसीने आर्यंशच्या पोस्टची दखल घेत माफी मागितली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्याच्याकडून अधिक माहिती मागितली आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर