मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा राष्ट्रगीतानं समारोप

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा राष्ट्रगीतानं समारोप

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 26, 2023 02:15 PM IST

Kartavya path parade News in Marathi : चित्ररथांचं प्रदर्शन, सैन्य दलाच्या थरारक कसरती, प्रात्यक्षिकांसह सुमारे तीन तास राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर आज प्रजासत्ताक दिन सोहळा रंगला.

Republic Day Parade
Republic Day Parade

Republic Day 2023 Celebration Live in Marathi : स्वतंत्र भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन सोहळा कर्तव्यपथवर साजरा करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजरोहणानं सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं. चित्ररथांचं प्रदर्शन, सैन्य दलाच्या थरारक कसरती, प्रात्यक्षिकांसह सुमारे तीन तास राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावर आज प्रजासत्ताक दिन सोहळा रंगला.

प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे लाइव्ह अपडेट्स:

 

  • प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा राष्ट्रगीतानं समारोप. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष
  • प्रजासत्ताक दिनी २१ तोफांची सलामी देण्यासाठी यंदा प्रथमच १०५ एमएम फिल्ड गनचा वापर करण्यात आला. ब्रिटिशकालीन २५ पाउंडर गनची जागा आता भारतीय बंदुकांनी घेतली आहे.

  • भारतीय सैन्याच्या ५० लढाऊ विमानांनी सादर केली चित्तथरारक प्रात्यक्षिके. हवाई दलाची ४५ विमाने, नौदलाचे एक आणि लष्कराच्या चार विमानांचा प्रात्यक्षिकांमध्ये समावेश.
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसहराज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली.
  • ‘३३ डेअर डेविल्स’च्या चमूनं ९ दुचाकींच्या मदतीनं साकारला श्वास रोखून धरायला लावणारा मानवी मनोरा.

Human Pyramid
Human Pyramid
  • हरयाणाच्या चित्ररथाची मध्यवर्ती संकल्पना भगवद्गीतेची आहे. महाभारताच्या युद्धातील विविध क्षणचित्रे चित्ररथावर साकारण्यात आली आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी बनून त्यांना गीतेचा उपदेश करताना दिसत आहेत.

haryana
haryana

 

  • महाराष्ट्र, पश्चिम बंगाल व तामिळनाडूच्या रंगीबिरंगी चित्ररथांनी वेधलं उपस्थितांचं लक्ष

  • केरळच्या चित्ररथातून नारी शक्ती व लोककलेच्या परंपरेचं दर्शन घडवण्यात आलं. वयाच्या ९६ व्या वर्षी साक्षरता परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या २०२० च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्या कार्तयानी आम्मा यांचीही झलक चित्ररथावर दाखवण्यात आली होती.

Keral
Keral
  • नवे जम्मू-काश्मीर ही जम्मू-काश्मीरच्या चित्ररथाची यंदाची थीम होती. यातून अमरनाथ मंदिर, ट्यूलिप गार्डन आणि लॅव्हेंडर लागवडीची झलक दाखवण्यात आली.

Jammu Kashmir
Jammu Kashmir
  • झारखंडच्या चित्ररथाच्या मध्यभागी बिरसा मुंडा यांचा पुतळा साकारण्यात आला होता. तसंच देवघर येथील बैद्यनाथ मंदिराची

Jharkhand
Jharkhand

उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथातून क्रीडा, पर्यावरण, संस्कृती, धर्म, इतिहास, साहस आणि पुरातत्व अशा क्षेत्राचा आलेख मांडला गेला व क्षेत्रातील पर्यटनाची क्षमता दर्शवते.

Arunachal
Arunachal

 

  • 'महिला सहभागातून पर्यटन व सेंद्रिय शेतीच्या द्वारे शाश्वत जीवन' ही त्रिपुराच्या चित्ररथाची थीम होती.

 

Tripura
Tripura
  • गुजरातचा चित्ररथ अक्षय्य ऊर्जा संकल्पनेवर आधारित होता. 'स्वच्छ व हरित ऊर्जा कार्यक्षम गुजरात'चा संदेश हा चित्ररथ देत होता.

Gujarat's tableau
Gujarat's tableau
  • लडाखचा चित्ररथ हा पर्यटन आणि सर्वसमावेश संस्कृतीचं दर्शन घडवणारा होता. लडाखचा निसर्ग, या निसर्गाशी असलेलं लडाखी जनतेचं नातं यावर चित्ररथातून प्रकाश टाकण्यात आला होता.

  • उत्तराखंडच्या चित्ररथातून कॉर्बेट नॅशनल पार्क आणि अल्मोरा येथील जगेश्वर धामचं दर्शन घडवण्यात आलं.

Uttarakhand's tableau
Uttarakhand's tableau
  • सामच्या चित्ररथाद्वारे बोटीवर स्वार झालेले अहोम योद्धा लचित बोरफुकन व कामाख्या देवीच्या मंदिराचं दर्शन घडवण्यात आलं.

  • मकर संक्रांतीच्या काळात साजऱ्या केल्या जाणाऱ्या 'प्रभाला तीर्थम' या उत्सवाची झलक आंध्र प्रदेशच्या चित्ररथाद्वारे दाखवण्यात आली.

  • कर्तव्यपथावर देशातील विविध राज्यांच्या चित्ररथांचं प्रदर्शन सुरू
  • सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) तुकडीतील शाही उंटांनी वेधलं उपस्थितांचं लक्ष

  • राष्ट्रपती मुर्मू यांनी स्वीकारली केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महिला तुकडीची सलामी

  • कर्तव्यपथवरील संचलनात सहभागी झालेल्या भारतीय नौदल व हवाई दलाच्या पथकाची एक झलक

  • 'अमृतसर एअरफिल्ड'चे कॅप्टन सुनील दशरथे व ५१२ लाइट एडी मिसाइल रेजिमेंटच्या लेफ्टनंट चेतना शर्मा यांच्या नेतृत्वाखाली २७ एअर डिफेन्स मिसाइल रेजिमेंटचा भाग असलेल्या 'आकाश'चं प्रदर्शन करण्यात आलं.

  • कर्तव्य पथावर भारतीय लष्कर आपल्या सामर्थ्याचं दर्शन जगाला घडवत आहे. लष्करी पदक विजेत्यांनी तिरंग्याला सलामी दिल्यानंतर शस्त्र संचलनाला सुरुवात झाली आहे. शेतात, वाळवंटासह विविध ठिकाणी हल्ला करण्याची क्षमता असलेल्या नाग क्षेपणास्त्राचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. 
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फडकावला तिरंगा. प्रजासत्ताक दिन सोहळ्याला सुरुवात
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्तव्यपथवर पोहोचले. थोड्याच वेळात सोहळ्याला सुरुवात
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सुमारे ६५ हजार लोक संचलनाचे साक्षीदार होतील असा अंदाज आहे.
  • सुरक्षेसाठी एनएसजी व निमलष्करी दलाच्या पथकासह सुमारे सहा हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कर्तव्य पथावर सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे.
  • यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे उपस्थित आहेत.
  • स्वतंत्र भारताचा आज ७४ वा प्रजासत्ताक दिन. या निमित्तानं राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

IPL_Entry_Point