मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Live News Updates 4 May 2023

Live News Updates

Live News Updates 4 May 2023: शरद पवार कार्यकर्त्यांना भेटले, एक-दोन दिवसांत निर्णय घेण्याचं आश्वासन

Sharad Pawar : मुंबईत चव्हाण सेंटरबाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना शरद पवार भेटले, एक ते दोन दिवसांत कार्यकर्त्यांच्या भावनांनुरूप निर्णय घेण्याचं दिलं आश्वासन.

Thu, 04 May 202305:47 PM IST

सुप्रिम कोर्टाचा निर्णय हसत-खेळत मान्य करू- कृषिमंत्री अब्दुल सत्तार

राज्यातील सत्तासंघर्षावर येत्या काही दिवसांत सुप्रीम कोर्टातून निकाल येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतही कोर्ट निकाल देणार असल्यामुळं महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष निकालाकडे आहे. त्यातच आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कोर्टाचा निकाल हसत-खेळत मान्य करणार असल्याचं म्हटलं आहे. आम्ही राहिलो आणि गेलो तरी इतिहास लिहिला जाणार आहे. आमच्या बाबतीत होणारा निर्णय देशासाठी लागू होणार आहे. त्यामुळं कोर्टाचा सुप्रीम निर्णय आम्ही आनंदाने मान्य करू, असं सत्तार यांनी म्हटलं आहे.

Thu, 04 May 202304:24 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राजभवन येथे जाऊन राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. राज्यपाल बैस यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या स्नेहभोजनासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना राज्यपालांनी आमंत्रित केले होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.

Thu, 04 May 202312:55 PM IST

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो गोव्यात दाखल

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांचे आज गोव्यात आगमन झाले. शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायजेशनच्या बैठकीसाठी भुट्टो जरदारी गोव्यात आले आहेत.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो गोव्यात दाखल
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो गोव्यात दाखल

Thu, 04 May 202310:13 AM IST

 Nana Patole : राज्यातील प्रश्नांवर चर्चेसाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन न बोलावल्यास राज्यभर आंदोलन करू - नाना पटोले

राज्यासमोरील प्रश्नांसदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची काँग्रेस शिष्टमंळानं भेट घेऊन दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत अशी विनंती करण्यात आलेली आहे. राज्याच्या हितासाठी राज्यपाल काँग्रेसच्या मागणीचा सहानुभूतीनं विचार करतील अशी अपेक्षा आहे. विशेष अधिवेशन बोलावलं नाही तर काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी राज्यभर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

Thu, 04 May 202309:48 AM IST

शरद पवार यांचा कार्यकर्त्यांशी संवाद जाणून घेतल्या भावना

मुंबईत चव्हाण सेंटरबाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना शरद पवार भेटले. कार्यकर्त्यांशी आधी बोललो असतो तर तुम्ही मला परवानगी दिली नसती. एक ते दोन दिवसांत कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित केली जाणार नाही. दोन दिवसांनंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही. शरद पवारांच कार्यकर्त्यांना आश्वासन

शरद पवार यांचा कार्यकर्त्यांशी संवाद
शरद पवार यांचा कार्यकर्त्यांशी संवाद

Thu, 04 May 202307:03 AM IST

जम्मू काश्मीरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, दोन्ही पायलट सुरक्षित

जम्मू काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यात आज सकाळी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. या अपघातानंतर हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुरक्षित असून एक पायलट किरकोळ जखमी झाला आहे. एएलएच ध्रूव हे लष्कराचे हेलिकॉप्टर नियमीत उड्डाण करत असताना त्याचे हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेशी संपर्क तुटले. त्यानंतर लष्कर, सशस्त्र सीमा बल आणि पोलिसांच्या मदतीने या हेलिकॉप्टरचा शोध घेण्यात आला.

जम्मू काश्मीरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं,
जम्मू काश्मीरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं,

Thu, 04 May 202306:39 AM IST

मणिपूरमध्ये आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण; ८ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी

ईशान्येकडील मणिपूर राज्यात स्थानिक आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने मोठ्या प्रमाणावर जाळपोळ सुरू झाली आहे. राज्यात आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. 

Violence broke out between tribals and non-tribals in Manipur
Violence broke out between tribals and non-tribals in Manipur (PTI)

Thu, 04 May 202305:05 AM IST

Stock Market Update : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स वधारला

मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी असून हेच चित्र आजही कायम आहे. आज सकाळपासूनच सेन्सेक्स आणि निफ्टीची वाटचाल सकारात्मक राहिली आहे. सेन्सेक्स १३० अंकांनी व निफ्टी ४० अंकांनी वधारला आहे.

Thu, 04 May 202304:40 AM IST

Uddhav Thackeray : बिहार विधानपरिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

Uddhav Thackeray : बिहार विधानपरिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर हे आज दुपारी १ वाजता मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. आमदार कपिल पाटील हेही यावेळी त्यांच्या सोबत असतील.

Thu, 04 May 202303:51 AM IST

Maharashtra Politics : पवारांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; केंद्रीय कायदा मंत्र्यांनी घेतली राहुल नार्वेकर यांची भेट

मुंबई : राज्यात सध्या मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहे. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यावर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. भाजपने देखील या घटनेची दखल घेतली आहे. राज्यातील सुरू असलेल्या घडामोडीवर दिललीवरून लक्ष ठेवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या पक्षप्रमुखांनी केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू हे राज्यात येत त्यांनी मुंबईत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यांनी राज्यातील परिस्थिती बाबत चर्चा केली. येत्या काळात उद्भवणाऱ्या परिस्थिती बाबत काय तयारी करता येईल याची देखील चर्चा झाल्याचे समजते.

Thu, 04 May 202302:34 AM IST

Pune : कुस्तीपटुंच्या आंदोलनाला पुण्यातील कुस्तीपटू प्रतिकात्मक कुस्त्या खेळून पाठिंबा देणार

दिल्लीत सुरु असलेल्या कुस्तीपटुंच्या आंदोलनाला पुण्यातील कुस्तीपटू प्रतिकात्मक कुस्त्या खेळून पाठिंबा देणार आहेत. एस पी कॉलेज समोर या प्रतिकात्मक कुस्त्यांचे कॉंग्रेस पक्षाकडून आयोजन करण्यात आले आहे.

Thu, 04 May 202302:32 AM IST

Mumbai : हसन मुश्रीफ यांच्या  अटकपूर्व जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी

 हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी ईडीच्या प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

Thu, 04 May 202302:31 AM IST

Mumbai : सुजात आंबेडकर यांची पत्रकार परिषद

 राजकीय सामाजिक गुन्हे किंवा खटले काढून घेण्यासाठी राज्यपातळीवर आंदोलनाबाबत सुजात आंबेडकर यांची पत्रकार परिषद होणार आहे.

Thu, 04 May 202302:31 AM IST

Mumbai : राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे पदाधिकारी आज एकत्रितरित्या शरद पवार यांना आपल्या पदाचे राजीनामे स्वतः भेटून देणार

 राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे पदाधिकारी आज एकत्रितरित्या शरद पवार यांना आपल्या पदाचे राजीनामे स्वतः भेटून देणार आहेत. पक्ष संघटना बळकट करायची असेल तर शरद पवार हेच अध्यक्ष आहेत अशी या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे.

Thu, 04 May 202302:30 AM IST

Dhamtari Accident : छत्तीसगडमधील धमतरी येथे भीषण अपघात; १० जागीच ठार; नशीब बलवत्तर म्हणून वाचली चिमुकली

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी राष्ट्रीय महामार्ग ३० वर बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. बोलेरो आणि ट्रकची भीषण धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की १० जणांचा जागीच मृत्यू झाला. नशीब बलवत्तर म्हणून एक चिमुकली या अपघातातून बचवली आहे. या अपघाताची माहिती, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट करून दिली आहे. त्यांनी चिमुकली लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली, तर अपघातात मृत्युमुखी झालेल्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला.

Thu, 04 May 202301:39 AM IST

Budhana News : आजपासून शेगावातील 'आनंद सागर'मधील अध्यात्मिक केंद्र भक्तांसाठी खुलं

राज्यातील मोठं देवस्थान असलेल्या शेगाव  येथील संत गजानन महाराज संस्थांनाकडून 2001 साली तत्कालीन विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून   'आनंद सागर' हे  पर्यटन आणि धार्मिक केंद्र  आजपासून सुरू होणार आहे.  पुढील काळात टप्प्याटप्प्यानं भाविकांसाठी इतरही काही सोयी सुविधा याठीकणी सुरू होणार  आहे.

Thu, 04 May 202301:03 AM IST

pune : करमणूक शुल्क आकारणीमध्ये सूट देण्याचा निर्णय

राज्यात १६ सप्टेंबर २०१७ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) अधिनियम लागू करण्यात आला. या दिनांकापासून ते राज्य शासनाचे करमणूक शुल्क आकारणी व वसुलीचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीसाठी करमणूक शुल्क आकारणीतून सूट देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महसुल व वन विभागाच्या ०१ जुलै २०१७ च्या निर्णयानुसार करमणूक शुल्क भरण्यापासून १५ सप्टेंबर, २०१७ पर्यंत दिलेली सूट पुढे १६ सप्टेंबर, २०१७ पासून ३० सप्टेंबर, २०२६ पर्यंतच्या कालावधीसाठी सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे.

Thu, 04 May 202301:03 AM IST

Pune: राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांकडून सफाई कामगारांच्या समस्यांचा आढावा

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आयोजित बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत विविध विभागांकडील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस पिंपरी- चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सल्लागार गिरेंद्र नाथ, पिंपरी चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधीष्ठाता डॉ. नरेश झांजड आदींसह सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Thu, 04 May 202301:02 AM IST

Pune : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेस ३० मे पर्यंत मुदतवाढ

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांकरीता सन २०२२-२३ मध्ये नवीन व नुतनीकरण अर्ज करण्यासाठी प्रक्रियेस ३० मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून अर्ज भरावा, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

Thu, 04 May 202301:01 AM IST

Russia Ukraine War :  पुतीन यांच्यावर ड्रोन हल्ला केल्याने रशिया भडकला; युक्रेनवर एयरस्ट्राईक, १६ ठार

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाला तब्बल १ वर्ष झाले आहे. आता युक्रेनने थेट रशियात घुसून रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या घरावर ड्रोन हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. यामुले संतप्त झालेल्या रशियाने युक्रेनवर एयर स्ट्राईक केला. यात १६ जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.