मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Live News Updates 30 April 2023

Live News Updates

Live News Updates 30 April 2023: राज्यातील राहिलेल्या बाजार समित्यांचा आज निकाल जाहीर होणार

APMC Election :सध्या राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. काही ठिकाणी शनिवारी मतदान प्रक्रिया होऊन निकाल लागले, तर तर काही ठिकाणचे निकाल अद्याप बाकी आहेत. आजही काही ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Sun, 30 Apr 202309:57 AM IST

Jayant Patil: पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉँग्रेसचाच; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले

Jayant Patil on Maharashtra Future CM: राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग येत आहेत. अजित पवार हे भावी मुख्यमंत्री असे बोर्ड झळकत असतांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील महत्वाचे वक्तव्य केले आहे.

Sun, 30 Apr 202307:22 AM IST

रास्तभाव दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देणार- अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण

रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना माफक दरात अन्नधान्य वितरित केले जाते. यापुढे या दुकानांच्या माध्यमातून नागरिकांशी निगडीत जास्तीत जास्त सुविधा पुरवल्या जातील, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. मारुंजी ता. मुळशी येथील प्रकाश बुचडे यांच्या रास्तभाव दुकानात नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या विविध सेवांचा शुभारंभ मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी आमदार योगेश टिळेकर, पीएमआरडीए चे आयुक्त राहूल महिवाल, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने, तहसीलदार रणजीत भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Sun, 30 Apr 202305:12 AM IST

महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत

 मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे.

Sun, 30 Apr 202305:12 AM IST

Pune : जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकटीकरणावर भर- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

जिल्हा नियोजन समितीच्या आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आरोग्य केंद्र आणि शाळांच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण करुन नागरिकांना उत्तम प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे, आशा स्वयंसेविका पुरस्कार आणि कायाकल्प बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, शरद बुट्टे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील आदी उपस्थित होते.

Sun, 30 Apr 202305:11 AM IST

Pune : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उत्कृष्ट मसुदा बनवा :   दीपक केसरकर  

 शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत विविध नावीन्यपूर्ण कल्पनांचे, विचारांचे सादरीकरण झाले आहे; त्याआधारे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उत्कृष्ट मसुदा तयार करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

Sun, 30 Apr 202303:54 AM IST

Pune Crime : पुण्यात बसमधून सव्वा कोटींच्या ड्रग्जची तस्करी, खराडीमध्ये तिघा तस्करांना ठोकल्या बेड्या

Pune Crime : पुण्यात अंमली पदार्थांची तस्करीचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी रात्री बसमधून तब्बल दीड कोटी रुपयांच्या ड्रग्सची तस्करी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Sun, 30 Apr 202303:30 AM IST

Amit Shah : राज्यात नेमकं चाललयं तरी काय ?; गृहमंत्री अमित शहा आज पुन्हा मुंबई दौऱ्यावर, चर्चांना उधाण

Home Minister Amit Shah To Visit Mumbai: राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तिसऱ्यांना महराष्ट्र दौऱ्यावर येत असून गेल्या १५ दिवसातील त्यांच्या आजचा दूसरा मुंबई दौरा आहेत. एका लग्नानिमित्त शहा हे मुंबईत येणार आहे.

Sun, 30 Apr 202302:37 AM IST

Maharashtra Weather : मराठवाडा आणि विदर्भाला ऑरेंज अलर्ट; अनेक जिल्ह्यात आजही अवकाळीचा कहर

Maharashtra Weather update : दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचे संकट आजही कायम आहे. विदर्भ, मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Sun, 30 Apr 202301:56 AM IST

Mumbai Rain : मुंबईत सकाळ पासून पावसाची हजेरी; वाढत्या उष्णतेपासून दिलासा 

मुंबईचे तापमानात मोठी वाढ झाली. उन्हामुळे नागरिकांची लाही लाही होत होती. दरम्यान, आज सकाळ पासून मुंबई आणि परिसरात पाऊस पडत असल्याने या वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

Sun, 30 Apr 202301:52 AM IST

Bhiwandi : भिवंडी इमारत दुर्घटनेत तीन ठार; ९ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

Bhiwandi Building Collapse In Valapada Bhiwandi : भिवंडीतील वळपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धमान कंपाऊंड नावाची इमारत कोसळली असून त्याच्या ढिगाऱ्याखाली तीन नागरिक ठार झाले आहेत. तर ९ जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sun, 30 Apr 202312:45 AM IST

APMC Election : बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी, आज राहिलेल्या बाजार समित्यांचा निकाल जाहीर होणार

सध्या राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. काही ठिकाणी शनिवारी मतदान प्रक्रिया होऊन निकाल लागले, तर तर काही ठिकाणचे निकाल अद्याप बाकी आहेत. आजही काही ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात १४७  पैकी ७६  कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीनं झेंडा फडकावला आहे. सत्ताधारी शिंदे आणि भाजप गटाला अवघ्या ३१  बाजार समित्यांमध्ये विजय मिळवला आहे.