Live News Updates 26 May 2023: समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Samriddhi Highway : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या ८२ किलोमीटरच्या दुसर्या टप्प्याच्या लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा टप्पा शिर्डी ते इगतपुरी असा आहे.
Mon, 29 May 20237:11 IST
Pune Fire : पुण्यातील कल्याणीनगर आयटी पार्कच्या पाचव्या मजल्यावर आग, इमारतीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु
कल्याणीनगर येथील मारीगोल्ड आयटी पार्क येथे आगीची घटना; अग्निशमन दलाकडून उंच शिडीची ब्रॉन्टो व इतर चार अग्निशमन वाहने दाखल. इमारतीत गच्चीवर अडकलेल्या 4 नागरिकांची सुटका तर अजून काही नागरिक अडकल्याची शक्यता
Fri, 26 May 202311:20 IST
Samriddhi Highway : समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Samriddhi Highway : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या ८२ किलोमीटरच्या दुसर्या टप्प्याच्या लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा टप्पा शिर्डी ते इगतपुरी असा आहे.
Fri, 26 May 202310:51 IST
Nana Patole : लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र काँग्रेसनं बोलावली बैठक
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं महत्वाची बैठक बोलावली आहे. टिळक भवन इथं २ व ३ जून रोजी लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला राज्यातील सर्व प्रमुख नेते व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रत्येक मतदारसंघाचा सर्व बाजूनं विचार केला जाणार आहे. धर्मांध व जातीवादी भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हेच काँग्रेसचे लक्ष्य असून आगामी लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याचा पक्षाचा निर्धार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
Fri, 26 May 20236:22 IST
Stock Market updates : शेअर बाजारात तेजीची लाट, सेन्सेक्स ३५० अंकांनी वाढला
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी कायम असून आजही सेनेक्स तब्बल ३५० अंकांनी वधारला आहे. निफ्टी देखील १०० हून अधिक अंकांनी वाढून ट्रेड करत आहे. बँक निफ्टीही सकारात्मक आहे.
Fri, 26 May 20236:27 IST
दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना कोर्टाकडू अंतरिम जामीन मंजूर
दिल्ली सरकारमधील माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजुर करण्यात आला आहे. सत्येंद्र जैन यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजुर करण्यात आला आहे. जैन हे जेलमध्ये पाय घसरून पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Fri, 26 May 20234:23 IST
Ravindra Vaidya death : समाजवादी नेते व पत्रकार रवींद्र वैद्य यांचं निधन
ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांचे आज पहाटे साडेबारा वाजता जव्हार येथे देहावसान झाले. ९० व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन विवाहित कन्या, मुलगा संदीप, सून, नातवंडे असा परिवार आहे. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी काम केले. आणीबाणीच्या काळात त्यांनी दोन वर्षे कारावास भोगला होता.
Fri, 26 May 20233:12 IST
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज छत्रपती संभाजीनगर दौरा
‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे आज शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असणार आहे.
Fri, 26 May 20232:50 IST
Admission : बारावीचा निकाल लागताच आता मिशन अॅडमिशन, मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. निकाल जाहीर होताच मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले. २७ मे पासून प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीला सुरुवात होणार आहे.
Fri, 26 May 20232:50 IST
New Parliament: नव्या संसदेत खासदारांची संख्या वाढणार? चर्चांना उधाण
संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होत आहे. या नव्या संसदेत खासदारांच्या बसण्याच्या जागा वाढवल्याने देशात लोकसभेच्या जागा वाढणार काय या चर्चांना उधाण आले आहे. जुन्या संसदेत लोकसभेत ५४३ खासदार बसू शकत होते, तर नव्या संसदेत ८८८ खासदार बसू शकतील अशी व्यवस्था आहे. तर राज्यसभेत सध्याची २५० ची क्षमता वाढवून ३८४ करण्यात आली आहे.
Fri, 26 May 20232:47 IST
Pune : जिल्हा रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही-आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या खाजगीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव जिल्हा सामान्य रुग्णालय पुणेतर्फे सादर करण्यात आलेला नाही आणि तसा कोणताही निर्णय झालेला नाही असे स्पष्टीकरण आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांनी केले आहे. मागील काही दिवसात माध्यमाद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या खाजगीकरणाबाबत काही चुकीच्या बातम्या देण्यात येत आहेत.
Fri, 26 May 20232:45 IST
Pune : विद्यार्थ्यांना करिअर विषयक माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबीर उपयुक्त-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्यादृष्टीने महत्वाचे असते. या दोन वर्षात विद्यार्थ्यांच्या जीवनाला वेगळे आणि महत्वाचे वळण मिळत असल्याने शिक्षण आणि करिअर घडविण्यासाठी विविध क्षेत्रांची माहिती देण्यासाठी करिअर मार्गदर्शन शिबीर उपयुक्त आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कोथरूड येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च शिक्षण सहसंचालक वाय. पी.पारगावकर , जिल्हा रोजगार शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बी.आर.शिंपले आदी उपस्थित होते.
Fri, 26 May 20232:04 IST
Mumbai News : मुंबईत आज-उद्या पाण्याचा मेगाब्लॉक, महापालिकेचा निर्णय
दादर पश्चिम परिसरात १,४५० मिमी व्यासाच्या तानसा जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे. २७ मे रोजी सकाळी आठ वाजेपासून ते २८ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत दुरुस्ती काम करताना या कालावधीत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
Fri, 26 May 20230:43 IST
new parliament building inauguration : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधकांचा बहिष्कार, पण 'हे' पक्ष होणार सहभागी!
new parliament building inauguration : भारताच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन २८ मे रोजी होणार आहे. १९ विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे सत्ताधारी एनडीए आघाडीसह २५ राजकीय पक्ष उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.