मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Live News Updates 25 May 2023

Live News Updates (HT)

Live News Updates 25 May 2023: अरविंद केजरीवाल यांनी घेतली शरद पवारांची भेट

Arvind Kejriwal meets Sharad Pawar : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

Thu, 25 May 202312:53 PM IST

Arvind Kejriwal meets Sharad Pawar : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली शरद पवार यांची भेट

Arvind Kejriwal meets Sharad Pawar : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. केंद्र सरकारनं काढलेल्या वटहुकुमाला संसदेत विरोध करण्याची विनंती केजरीवाल यांनी पवारांकडं केली.

Arvind Kejriwal meets Sharad Pawar
Arvind Kejriwal meets Sharad Pawar

Thu, 25 May 202312:53 PM IST

Nana Patole : पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करून पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्या - नाना पटोले

पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील हजारो मुला-मुलींसाठी मुंबईतील ७ मे २०२३ रोजीची पोलीस भरती परिक्षा ही एक मोठी संधी होती. परंतु या पोलीस भरतीमध्ये अनुचित प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. या परिक्षेत मोठ्या प्रमाणात हायटेक कॉपी करण्यात आली. कमी मार्क असलेल्या मुलांना पात्र ठरवण्यात आले, यासह भरतीसाठी मुलांकडून १५-१५ लाख रुपये घेण्यात आल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करावी व नव्याने पारदर्शक पद्धतीने फेरपरिक्षा घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Thu, 25 May 202311:17 AM IST

नौदलाच्या INS विक्रांत युद्धनौकेवर आज MIG 29k या युद्धक विमानाने रात्रीचे लँडिंग यशस्वी.

नौदलाच्या INS विक्रांत युद्धनौकेवर आज MIG 29k या युद्धक विमानाने रात्रीचे लँडिंग यशस्वी झाले आहे. भारतीय नौदलासाठी हा महत्वाचा टप्पा मानला जातोय. INS विक्रांत युद्धनौका संपूर्णपणे भारतीय बनावटीची असून यावर मिग 29k जातीची १२ विमाने तैनात ठेवण्याची योजना आहे. 

Thu, 25 May 202311:14 AM IST

Closing bell :  आज तेजीत बंद झाला निर्देशांक, अदानी स्टाॅक्स वधारला.

आज शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स ९८अंकांनी वाढून ६१,८७२ अंकावर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी देखील ३५ अंकांनी वाढला. तो १८,३२१ अंकाच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १६ वधारले आणि १२ घसरले. अदानी एंटरप्रायझेसच्या समभागात आज २.९२ टक्क्यांची ची वाढ झाली आहे.

Thu, 25 May 202311:10 AM IST

PNG :  गार्गी बाय पीएनजीचे पहिले ब्रँड स्टोअर पुण्यात सुरु 

महाराष्ट्रातील पहिली लिस्टेड, तरुण व सर्वाधिक पुरस्कारांनी सन्मानित ब्रँड गार्गी बाय पीएनजीने पहिले ब्रँड स्टोअर पुण्यात केले आहे. त्याचे उद्घाटन गुरुपुष्यामृताच्या योगावर झाले. आगामी काळात भारतात गार्गी बाय पीएनजीचा विस्तार होणार आहे. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर पंजाब नॅशनल बँकेजवळ मयूर इस्टेट येथे एक हजार चौरस फुटांत जागतिक स्टाइल व दर्जाचे ब्रँड स्टोअर गार्गी बाया पीएनजीचे दालन आहे.

Thu, 25 May 202309:39 AM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर; ‘शासन आपल्या दारी’चंरत्ना उदघाटन

रत्नागिरीः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. शासन आपल्या दारी उपक्रमाचं शिंदे यांनी उदघाटन केलं. यावेळी कृषीमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर; ‘शासन आपल्या दारी’चंरत्ना उदघाटन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर; ‘शासन आपल्या दारी’चंरत्ना उदघाटन

Thu, 25 May 202308:15 AM IST

IRDA :  येत्या १ आॅगस्टपासून विम्यासाठी दोन आॅनलाईन प्लॅटफाॅर्म्स सुरु 

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) लवकरच पाॅलिसीधारकांसाठी दोन मोठ्या सुविधा सुरु करणार आहे. या अंतर्गत दोन आॅनलाईन प्लॅटफाॅर्म हेल्थ क्लेम्स एक्सेंज आणि विमा सुगम सुरु करण्यात येतील. याच्या मदतीने विमा खरेदीपासून ते दावे निकाली काढेपर्यंतच्या सर्व प्रकरणे हाताळली जातील. इरडाने एक आॅगस्ट २०२३ पासून या नव्या सुविधा सुरु करण्याची तयारी केली आहे.

Thu, 25 May 202307:20 AM IST

munawwar rana : प्रसिद्ध कवी, शायर मुनव्वर राणा यांची प्रकृती खालावली, आयसीयूत उपचार

munawwar rana : प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांची प्रकृती गुरुवारी सकाळी अचानक बिघडली. राणा यांना लखनऊच्या अपोलो रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांची मुलगी सुमैया राणा हिनं ही माहिती दिली आहे. 

Thu, 25 May 202306:51 AM IST

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईला दिल्लीच्या जेलमध्ये हलवले

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याला गुजरातमधून दिल्लीला आणण्यात आले आहे. बिष्णोई याला दिल्लीच्या मंडोली कारागृहात ठेवण्यात आले आहे. दिल्लीच्या तिहार जेलमध्ये २ मे रोजी कुख्यात गुंड टिल्लू ताजपुरीया याच्या हत्येनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईला दिल्लीच्या जेलमध्ये हलवले
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईला दिल्लीच्या जेलमध्ये हलवले

Thu, 25 May 202305:29 AM IST

Satyendar Jain : तिहार तुरुंगात असलेले 'आप'चे नेते सत्येंद्र जैन बाथरूममध्ये पडले, रुग्णालयात दाखल

Satyendar Jain Hospitalised : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे नेते व माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी जेलच्या बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानं ते जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आलं आहे. तिथं त्यांची तपासणी केली जात आहे.

Thu, 25 May 202303:47 AM IST

PM Modi : पंतप्रधान मोदी पहाटे दिल्लीला परतले, ११ वाजता वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा

सहा दिवसांच्या तीन देशांच्या दौऱ्याची सांगता करून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले. पालम विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक मंत्री, खासदार आणि भाजप नेते आणि कार्यकर्ते विमानतळावर पोहोचले. लोकांनी येथे मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनीही येथे उपस्थितांना संबोधित केले. यावेळी तो खूपच फ्रेश दिसत होता. एवढा लांबचा प्रवास करूनही त्याच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतताच सक्रिय झाले आहेत. आज सकाळी ११ वाजता ते दिल्ली-डेहराडून भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.

Thu, 25 May 202303:39 AM IST

Ambadas Danve : बारसू प्रकरणी अंबादास दानवे आज पोलीस महासंचालकांची भेट घेणार

बारसू रिफायनरी प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज सकाळी १०.३० वाजता पोलीस महासंचालकांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर सकाळी ११ वाजता अजिंक्यतारा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

Thu, 25 May 202302:22 AM IST

Best Bekri : बहुचर्चित बेस्ट बेकरी केस प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाचा आज निकाल  

बहुचर्चित बेस्ट बेकरी केस प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल आज अपेक्षित. साल  २००२ मध्ये गुजरातमधील वडोदरा इथं गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या हिसांचारातील  बेस्ट बेकरी हत्याकांड घडले होते. या  घटनेत जमावानं १४  जणांना अतिशय निर्घृणपणे मारलं होतं.  

Thu, 25 May 202302:20 AM IST

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे उदघाट्न होणार आहे. तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या सुशोभित करण्यात आलेल्या वास्तूचे लोकार्पण देखील पार पडणार आहे. 

Thu, 25 May 202302:19 AM IST

HSC Result Today : विद्यार्थ्यांनो ऑल द बेस्ट ! बारावीचा आज निकाल; 'या' ठिकाणी पाहा रिजल्ट

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकालाची प्रतीक्षा संपली आहे. हा निकाल आज दुपारी २ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

Thu, 25 May 202301:59 AM IST

CM Ekanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर असून ते ११ वाजता येथील  विमानतळावर दाखल होणार आहे.  ते ११.१५ वाजता प्रमोद महाजन क्रीडा संकुल येते कार्यक्रमला हजेरी लावतील.दुपारी ते अर्धा तास कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 

Thu, 25 May 202301:10 AM IST

Pune : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदी व कर्मचाऱ्यांसाठी नेत्र तपासणी शिबीर संपन्न

येरवडा मध्यवर्ती कारागृह, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंदी व कर्मचारी यांची मोफत नेत्र, मोतीबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी अपर पोलीस महासंचालक व कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक अनिल खामकर, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे संचालक परवेज बिलिमोरिया, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे अध्यक्ष संकेत शहा उपस्थित होते.

Thu, 25 May 202312:22 AM IST

 Imran Khan: इम्रान खानच्या पक्षाला मोठी गळती; अनेक मातब्बर नेत्यांचा पक्षाला अलविदा

पाकिस्तानमध्ये सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत. तेहरिके-ए-इंसाफ या इम्रान खानच्या पक्षाला मोठी गळती लागली आहे. मोठ्या नेत्यांनी लष्कराच्या आणि पाकिस्तान सरकारच्या दबावामुळे पक्षाला अलविदा केल्याने इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.