मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Live News Updates 2 June 2023

Live News Updates 2 June 2023(HT)

Live News Updates 2 June 2023: कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांची बदली

Officers Transfer News : कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांची बदली करण्यात आली आहे. बलकवडे यांची पुणे येथील महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणच्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Fri, 02 Jun 202312:51 PM IST

महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांना निरोप

महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे हे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर बुधवारी (३१ मे) निवृत्त झाले. पावणेदोन वर्षांपासून ते महावितरणच्या औरंगाबाद शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते. महावितरणच्या वतीने त्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला.

Fri, 02 Jun 202312:34 PM IST

Sigma project : पुण्याच्या कुमठेकर रोडवर साकारणार सिग्मा वन बिझबे प्रकल्प

रिअल इस्टेट, लिजिंग, बांधकाम, कॉन्ट्रॅक्टिंग आणि संबंधित कार्यांत अग्रेसर असलेल्या बहुआयामी आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सिग्मा वन युनिव्हर्सल कडून आज आपला महत्त्वपूर्ण व्यावसायिक प्रकल्प सिग्मा वन बिझबे सुरु करत असल्याची घोषणा केली. हा आयकॉनिक प्रकल्प पुण्यातील कुमठेकर रोडवर अगदी मोक्याच्या ठिकाणी असल्याने शहराचा व्यावसायिक चेहेरामोहरा बदलणार आहे.

Fri, 02 Jun 202311:26 AM IST

कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांची बदली 

कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांची बदली करण्यात आली आहे. बलकवडे यांची पुणे येथील महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणच्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Fri, 02 Jun 202311:23 AM IST

Closing bell :  आठवड्याच्या शेवटच्या सत्रात निर्देशांक वाढीसह बंद 

महिन्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार वाढ नोंदवत बंद झाला. रियल्टी, मेटल, ऑटो समभागात तेजी आली. एफएमसीजी, फार्मा, इन्फ्रा निर्देशांकात वाढ झाली. बँकिंग, पीएसई निर्देशांकात खरेदी दिसून आली तर आयटी, ऊर्जा समभागांवर दबाव दिसून आला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स ११८.५७ अंकांच्या किंवा ०.१९ टक्क्यांच्या वाढीसह ६२,५४७.११ वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी ४६.३५ अंकांच्या म्हणजेच ०.२५ टक्क्यांच्या वाढीसह १८५३४.१० च्या पातळीवर बंद झाला.

हिंदाल्को इंडस्ट्रीज, अपोलो हॉस्पिटल्स, हिरो मोटोकॉर्प, टाटा स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टील हे शुक्रवारच्या व्यवहारात निफ्टीमध्ये आघाडीवर होते. दुसरीकडे, अदानी एंटरप्रायझेस, इन्फोसिस, बीपीसीएल, एचडीएफसी लाइफ आणि टीसीएस निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले.

Fri, 02 Jun 202308:56 AM IST

Eknath Shinde : दहावीच्या परीक्षेतील गुणवंतांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं अभिनंदन

‘दहावीच्या परीक्षेतील यशानंतर करिअर निवडीसाठी अनेक मार्ग दिसू लागतात. या मार्गावरून पुढे जाण्यासाठी, आवडते क्षेत्र निवडण्यासाठी आणि त्यात यशस्वी होण्यासाठी मनापासून शुभेच्छा, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहावीच्या परीक्षेतील यशवंत, गुणवंतांचे अभिनंदन केले आहे.

Fri, 02 Jun 202304:06 AM IST

Kotak mintra deal : डिजीटल कार्डसाठी कोटक बँक मिंत्रा यांच्यात करार 

कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने  आॅनलाईन फॅशन स्टोअऱ मिंत्रासोबत को-ब्रॅण्‍डेड डिजिटल फॅशन व लाइफस्‍टाइल क्रेडिट कार्डच्‍या लाँचची घोषणा केली. अनेक फायदे देणारे ‘को-ब्रॅण्‍डेड कोटक मिंत्रा क्रेडिट कार्ड’ फॅशनप्रेमी ग्राहकांना अमर्यादित व्‍यवहारांच्या माध्‍यमातून त्‍यांच्‍या बचतींवर उत्तम मूल्‍य अनलॉक करण्‍यास सक्षम करेल. मिंत्रा, तसेच कोटक मोबाइल अॅप्‍लीकेशन्‍समध्‍ये काही मिनिटांमध्‍येच विनासायास डिजिटल प्रवासाच्‍या माध्‍यमातून या कार्डचा लाभ घेऊ शकतात. मिंत्रा ग्राहक अॅपवर पूर्णत: डिजिटल माध्‍यमातून कार्डसाठी अर्ज करू शकतात.

Fri, 02 Jun 202304:00 AM IST

Opening Bell :  सेन्सेक्स निफ्टीची दिमाखदार सुरुवात, अदानी एन्टरप्राईजेस टाॅप गेनर्समध्ये

आशियाई बाजारपेठांतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली आहे. बाजार खुला होताच सेन्सेक्समध्ये १९० अंशांची वाढ नोंदवत तो ६२,६७३.१५ अंश पातळीवर खुला झाला. तर निफ्टीतही ७७.६० अंशांची वाढ होत तो अंदाजे १८,५५० अंश पातळीवर खुला झाला. आज सकाळी हिरोमोटो काॅर्प, हिंन्दाल्को, अदानी एन्टरप्राईजेस, अदानी पोर्ट्स, टेक महिंद्रा हे स्टाॅक्स टाॅप गेनर्सच्या यादीत होते. तर इन्फोसिस, इंड्सएड बँक, कोल इंडिया, एशियन पेंट्स आणि टाटा मोटर्स हे स्टाॅक्स टाॅप लूजर्समध्ये आहेत.

Fri, 02 Jun 202303:21 AM IST

Shivrajyabhishek Din 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगडावर पोहचले 

आज तिथीनुसार ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. श्री शिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती दुर्गराज, रायगड समितीकडून तिथीनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगडावर पोहचले आहेत.

Fri, 02 Jun 202303:20 AM IST

Mumbai Weather Update : मुंबई तापणार ! उष्णतेच्या लाटेमुळे घराबाहेर पडण्यापूर्वी काळजी घ्या

Mumbai Weather Update : राज्यात पुढील काही दिवस उष्णतमान वाढणार आहे. मुंबईत कालचे तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या घरात पोहचले होते. दरम्यान, आज देखील उन्हाचा पारा मुंबईकरांचा घाम काढणार असल्याने बाहेर जातांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केली आहे.

Fri, 02 Jun 202302:08 AM IST

MNS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहचले रायगडावर 

आज तिथीनुसार ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. श्री शिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती दुर्गराज, रायगड समितीकडून तिथीनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील रायगडावर या कार्यक्रमासाठी पोहचले आहेत. 

Fri, 02 Jun 202302:05 AM IST

Agni-1 Missile : चीन, पाकिस्तानला भरणार धडकी; DRDO नं केले अग्नी १ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण

Agni 1 Missile Launch : भारताने अग्नी १ या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे. यामुळे शत्रूच्या ठिकाणांवर अचूक मारा करता येणार आहे.

Fri, 02 Jun 202312:34 AM IST

SSC Result : दहावीचा आज निकाल 

बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर दहावीचा निकाल कधी लागणार या बाबत पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा संपली असून आज २ जून रोजी १ वाजता हा निकाल जाहीर होणार आहे.

Fri, 02 Jun 202312:33 AM IST

Shivrajyabhishek Din 2023 : शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगड सज्ज

मुंबई: राजगडावर यंदा शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या थाटामाठात साजरा केला जाणार आहे. या साठी राज्य शासनाने जय्यत तयारी केली आहे. आज रायगडावर शिरकाई मंदिरात पूजा करण्यात आली असून या नंतर जगदिश्वराच्या मंदिरात आणि वाडेश्वर मंदिरात विधिवत अभिषेक करण्यात येणार आहे.

Fri, 02 Jun 202312:32 AM IST

पंढरीच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करा :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई  : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री  शिंदे यांनी केली. पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वेळेत दर्शन व्हावे यासाठी विशेष सुविधा करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Fri, 02 Jun 202312:31 AM IST

Eknath shinde : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काळातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी जगभरात असलेले शिवकालिन साहित्य आणि वस्तूंचे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे संकलन करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

Fri, 02 Jun 202312:29 AM IST

PTI च्या मागे पडले पाक सरकार; इमारण खानच्या जवळच्या खासदाराला अटक

Pakistan News: पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांच्या मागे पाकिस्तान सरकार हात धुन मागे लागले आहे. त्यांच्या अनेक खासदारांना पोलिसांनी अटक केली आहे. इमरान खान यांच्या जवळचे आणि विश्वासू समजले जाणारे तसेच पीटीआयचे अध्यक्ष चौधरी परवेज यांना त्यांच्या घरातून ओढत नेत पोलिसांनी अटक केली आहे.