मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Live News Updates 1 June 2023

Live News Updates 1 June (HT)

Live News Updates 1 June 2023: न्यायालयीन आयोग करणार मणिपूर हिंसाचाराची चौकशी

Manipur Violence : मणिपूर हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन केला जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिली.

Thu, 01 Jun 202305:19 PM IST

भरधाव रिक्षाचा ब्रेक फेल होऊन २० फूट खोल खड्ड्यात कोसळली, चिमुरड्यासह तिघांचा मृत्यू

भिवंडीत रिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका चिमुकल्याचाही समावेश आहेब्रेक फेल झालेली रिक्षा पाण्याने भरलेल्या २० फूट खोल खड्ड्यात कोसळली. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. 

Thu, 01 Jun 202302:16 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल

Thu, 01 Jun 202301:44 PM IST

पुण्यात काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस

पुणे आणि परिसरातील काही भागात वादळी वाऱ्यासह आज, गुरुवारी पाऊस पडला

Thu, 01 Jun 202301:34 PM IST

 नेपाळी कामगारांना पुण्याला घेऊन जाताना मांगिरी घाटात आगीत बस खाक

रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबाहून पुण्याला नेपाळी कामगारांना घेउन निघालेल्या प्रवासी बसला कराड- शेडगेवाडी रस्त्यावरील मांगिरी खिंडीत आग लागण्याचा प्रकार गुरूवारी पहाटे घडला. या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले.

Thu, 01 Jun 202301:25 PM IST

MPCC Meeting : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची बैठक

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून बैठकीला राज्यातील प्रमुख नेते व सर्व जिल्हा अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

Thu, 01 Jun 202312:15 PM IST

Nana Patole : आरक्षणाच्या नावाखाली मराठा व कुणबी यांच्यात भांडण लावण्याचे भाजपाचे षडयंत्र - नाना पटोले

आरक्षणाबदद्ल भारतीय जनता पक्षाची भूमिका सर्वांना माहित आहे, भाजपा हा आरक्षण विरोधी आहे. २०१४–१९ मध्ये राज्यात फडणवीस सरकार होते. त्यांच्याच सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, सुप्रीम कोर्टाने त्यावर ताशेरे ओढले. फडणवीस सरकरला अधिकार नसतानाही त्यांनी गायकवाड आयोग नेमला होता. भाजपा आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाची दिशाभूल करून कुणबी व मराठ्यांमध्ये भांडण लावण्याचे काम करत आहेत. भाजपाच्या या कुटनीतीला मराठा व कुणबी समाज ओळखून आहे, असंही पटोले म्हणाले.

Thu, 01 Jun 202310:52 AM IST

गोसीखुर्द जलाशयात जलपर्यटन प्रकल्प

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशय येथे जागतिक दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. गोसीखुर्द जलाशयात ४५ कि.मी. जलप्रवास पात्र आहे. याठिकाणची नैसर्गिक विविधता, मोठ्या बेटांची आणि बंदरांची उपलब्धता असल्याने आंतरराष्ट्रीय जलपर्यटन करण्यात येणार आहे. देशातील सर्वोत्तम असा हा जलपर्यटन प्रकल्प जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

Thu, 01 Jun 202310:41 AM IST

४० प्रवाशांसह बस दरीत कोसळली

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात ४० प्रवाशांसह बस दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील अनेक प्रवाशांसह चालक आणि वाहक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Bus with over 40 passengers falls into gorge in Himachal Pradesh
Bus with over 40 passengers falls into gorge in Himachal Pradesh

Thu, 01 Jun 202308:11 AM IST

दहावीचा SSC बोर्डाचा निकाल उद्या, २ जून रोजी लागणार

दहावीचा SSC बोर्डाचा निकाल उद्या, २ जून रोजी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

Thu, 01 Jun 202307:21 AM IST

Manipur Violence : मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोगाची स्थापना करणार - अमित शहा

मणिपूर हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन केला जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिली. मणिपूरमध्ये ३ मेपासून सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ८० जणांना जीव गमवावा लागला आहे. गृहमंत्री गेल्या तीन दिवसांपासून मणिपूरमध्ये आहेत. या दरम्यान त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांसाठी मोठ्या घोषणाही केल्या आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई आणि एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येईल, असंही शहा यांनी सांगितलं. पाच लाख रुपये केंद्र सरकार आणि पाच लाख रुपये राज्य सरकार देणार आहे.

Thu, 01 Jun 202306:43 AM IST

IB recruitment : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मेगा भरती ! तब्बल ७९७ अधिकाऱ्यांची पदे भरणार 

IB recruitment : इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीच्या अधिकाऱ्यांची तब्बल ७९७ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उद्या ३ जून पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून २३ जून पर्यंत अर्ज भरता येणार आहे.

Thu, 01 Jun 202303:16 AM IST

Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या समर्थनात आज महापंचायत, मुझफ्फरनगरमध्ये देशभरातील खापचे प्रतिनिधी एकवटणार

बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकेत यांनी आज  खाप महापंचायत बोलावली आहे. ही महापंचायत उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये आयोजित केली जाणार आहे.

Thu, 01 Jun 202302:34 AM IST

Nepal PM India Visit: नेपाळचे पंतप्रधान आज मोदींची भेट घेणार; व्यापारासह सीमा समस्यांवरही चर्चा होणार

डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर प्रचंड यांचा हा पहिलाच द्विपक्षीय परदेश दौरा आहे. चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल 'प्रचंड' गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

Thu, 01 Jun 202302:33 AM IST

RBI : 100 दिवस 100 पेमेंट मोहीमेला सुरुवात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं अनक्लेम्ड रक्कम परत करण्यासाठी 100 दिवस 100 पेमेंट मोहीम सुरू केली आहे. याद्वारे RBI नं बँकांना प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बँकेतील किमान 100 अनक्लेम्ड डिपॉजिट ठेवी ग्राहकांना 100 दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश दिले आहेत. याद्वारे आरबीआय इनअॅक्टिव आणि अनक्लेम्ड रकमेची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

Thu, 01 Jun 202301:53 AM IST

रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार

मुंबई  : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता या सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. या सोहळ्यात १ जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Thu, 01 Jun 202301:52 AM IST

Baramati : बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण

बारामती, जि.पुणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासनाच्या वतीने त्यांच्या कर्तृत्वाच्या गौरव म्हणून  या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला. 

Thu, 01 Jun 202312:47 AM IST

New Train for LAC : आता थेट दिल्ली ते नथूला पर्यंत धावणार रेल्वे; चीनच्या चालबाजीला बसणार लगाम

New Train for LAC : केंद्र सरकार शिवोक-रंगपो रेल्वे लाईन योजनेच्या विस्ताराअंतर्गत भारत-चीन सीमेपर्यंत रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या तयारीत आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोक मार्गे रांगपो नाथुला ते चीनच्या सीमेपर्यंत नवीन रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहे. विभागीय रेल्वे रंगपो-गंगटोक रेल्वे मार्गाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करत आहे, जो ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल.