मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Live News Updates 01 April 2023 Maharashtra Breaking News Todays

coronavirus in Maharashtra

Live News Updates 01 April 2023: संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात

Sanjay Raut: खासदार संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या हवाली केली आहे.

Sat, 01 Apr 202301:46 PM IST

पुणेः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साजरा कला 'एप्रिल फुल' दिन

भारतीय नागरीकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देशात आणि महाराष्ट्रात फसवा विकास केला आहे, हा फसवा विकास म्हणजेच मोदी विकास म्हणून मोदी विकासाचा वाढदिवस १ एप्रिल ‘एप्रिल फुल’ या दिवशी साजरा करून पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने डेक्कन येथील गुडलक चौकात प्रतिकात्मक आंदोलन करुन मोदी वाढदिवसाचा केक कापण्यात आला.

NCP agitation in Pune
NCP agitation in Pune

Sat, 01 Apr 202312:07 PM IST

भोपाळ - नवी दिल्ली ‘वंदे भार’त ट्रेनला पंतप्रधान मोदींकडून हिरवी झेंडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भोपाळ ते नवी दिल्ली दरम्यान नव्या ‘वंदे भारत’ रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते.

Bhopal-New Delhi Vande Bharat Express
Bhopal-New Delhi Vande Bharat Express

Sat, 01 Apr 202311:48 AM IST

सुवर्णपदक विजेती बॉक्सर निकहत झरीनचे हैदराबाद शहरात शानदार स्वागत

दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत ५० किलो वजनी गटात सलग दुसऱ्या वर्षी सुवर्ण पदक विजेती बॉक्सर निकहत झरीन हिचे आज हैदराबाद शहरात आगमन झाले. यावेळी क्रिडा प्रेमींकडून तिचे स्वागत करण्यात आले. 

Two time world champion boxer Nikhat Zareen
Two time world champion boxer Nikhat Zareen

Sat, 01 Apr 202307:01 AM IST

Sanjay Raut: संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात

खासदार संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या हवाली केली आहे.

Sat, 01 Apr 202306:59 AM IST

Sharad Pawar: एका अतिशय प्रामाणिक, परिपक्व सहकाऱ्याला मुकलो - शरद पवार

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान संस्थेतील माझे सहकारी व माजी सनदी अधिकारी शरद काळे यांच्या दु:खद निधनाने मला धक्का बसला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी आपली शोकभावना व्यक्त केली आहे.

Sat, 01 Apr 202306:07 AM IST

Covid-19: कोरोनाचा धोका वाढतोय, देशात गेल्या २४ तासात २,९९४ रुग्ण आढळले

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. देशात गेल्या २४ तासात २ हजार ९९४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे देशातील सक्रीय रुग्णांची संख्या १६ हजार ३५४ वर पोहचली आहे.

Sat, 01 Apr 202306:04 AM IST

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर हाणामारीप्रकरणी आणखी दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी १० जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती डीसीपी शिलवंत नांदेडकर यांनी दिली आहे.

Sat, 01 Apr 202304:33 AM IST

Conavirus: कोल्हापूरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय

कोल्हापुरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली असून महिन्याभरात जिल्ह्यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर येथील सक्रीय रुग्णांची संख्या ५४ आहे. यातील १५ जणांवर उपचार सुरू आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे.

Sat, 01 Apr 202303:38 AM IST

Mumbai: इंडिगो एअरलाइन्सच्या क्रू मेंबरचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

इंडिगो एअरलाइन्सच्या क्रू सदस्यांच्या तक्रारीनंतर गुरुवारी बँकॉक-मुंबई फ्लाइटमध्ये क्रू मेंबरचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. अटक आरोपीला शुक्रवारी अंधेरी न्यायालयात हजर केले असता त्याला जामीन मंजूर केला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Sat, 01 Apr 202303:02 AM IST

Coronavirus:धाराशिवमध्ये कोरोनाने ६५ वर्षीय नागरिकाचा मृत्यू

धाराशिवच्या कळंब तालुक्यातील इटकूर येथील एका ६५ वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात २९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

Sat, 01 Apr 202302:10 AM IST

 LPG Cylinder: एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत घट, जाणून घ्या नवा दर

१९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती ९१.५० रुपयांनी कमी झाल्या आहेत. दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत २ हजार २८ रुपये आहे. देशांतर्गत एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल नाही

Sat, 01 Apr 202301:19 AM IST

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात १३ एप्रिलपर्यत जमावबंदीचे आदेश

यवतमाळ जिल्ह्यात लव जिहादवरून आंदोलन निषेध मोर्चे काढण्याची शक्यता असल्याचे नमूद करून अप्पर जिल्हा दंडाधिकारी ललित व्हराडे यांनी १३ एप्रिलपर्यत जमावबंदीचे आदेश काढले आहेत. रमजान ईद, महावीर जयंती, हनुमान जयंती आदी सण उत्सव लक्षात घेता प्रतिबंधात्मक कलम ३७१ अन्वये आदेश काढले.