मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  फोटो पाहून पसंत करा महिला; गर्भवती राहून मुल झाल्यास मिळणार १३ लाख; अनेक युवकांना जाळ्यात अडकवून लुटले

फोटो पाहून पसंत करा महिला; गर्भवती राहून मुल झाल्यास मिळणार १३ लाख; अनेक युवकांना जाळ्यात अडकवून लुटले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 31, 2023 03:03 PM IST

sex hunger robbery : महिलांना गर्भवती करून त्यांना मुलगा झाल्यास १३ लाख रुपये मिळतील अशा जाहिराती करून तरुणांना तुटणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात आले आहे.

sex hunger robbery
sex hunger robbery

sex hunger robbery : माहितीच्या युगात आज सायबर चोरट्यांनी लूटमार आणि चोरी करण्याचे नवे फंडे शोधले आहेत. अशाच एका टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी महिलांची शारीरिक संबंध ठेवण्याचे आमिष दाखवत त्या गर्भवती राहून त्यांना मुल झाल्यास १३ लाख रुपये देण्याचे आमिष पुरुषांना देत. या माध्यमातून त्यांना जाळ्यात अडकवून ऑनलाइन माध्यमांतून त्यांची फसवूक केली जात होती. यात अनेक तरुण अडकले होते. या प्रकरणी नवादा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून या टोळीला गजाआड केले आहे.

Mumbai Pune Express Way : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर पुन्हा वाहतूक कोंडी; नववर्षानिमित्त बाहेर पडलेले नागरीक कोंडीत अडकले

बिहार राज्यातील नवादा पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. सायबर चोरट्यांनी अवलंबलेल्या या नव्या फसवणूकीच्या पद्धतीने सर्वांना धक्का बसला आहे. सायबर चोरट्यांची ही टोळी नवादा जिल्ह्यात 'ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब एजन्सी' मार्फत फसवणुकीचे काम करत होते. या अंतर्गत तरुणांना महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांना गर्भवती करण्याचे कामाचे आमिष त्यांना दाखवले जात होते. या महिलांना मुलगा झाल्यास १३ लाख रुपये मिळतील अशी बतावणी देखील केली जात होती. या खोट्या एजन्सीच्या माध्यमातून अनेक तरुणांना तरुणांना सेक्सच्या जाळ्यात अडकवून त्यांना लुटले जात होते.

New year 2024: नव्या वर्षात बदलणार अनेक आर्थिक नियम, तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? वाचा!

शुक्रवारी पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करून आठ जणांना अटक केली. त्यांनी या साठी नोंदणीच्या नावाखाली लोकांकडून ७९९ रुपये उकळले जायचे. यानंतर त्यांना विविध महिलांचे फोटो दाखवून ज्यांना मुल होत नाही त्यांच्याही शरीर संबंध ठेऊन त्यांना गर्भवती करण्याची ऑफर दिली जात होती. ज्या महिला गर्भवती राहून त्यांना मुल झाल्यास त्यांना १३ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले जात होते. अखेर पोलिसांनी शिताफीने या टोळीला गजाआड केले. मात्र, या टोळीचा म्होरक्या मुन्ना पळून जाण्यात यशस्वी ठरला.

अशी व्हायची फसवणूक ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचे काम करण्याची पद्धत ही धक्कादायक होती. ही टोळी व्हॉट्सअॅपद्वारे तरूणांशी संपर्क साधत. त्यांना ज्या महिला त्यांच्या पतीपासून गर्भवती राहू शकत नाहीत त्यांना मदत करण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांकडून नोंदणीसाठी ७९९ रुपये नोंदणी फी म्हणून आकारली जात होती. यानंतर त्यांना महिलांची छायाचित्रे पाठवली गेली. जेणेकरून ते त्यांच्या आवडीने महिलांशी निवड करत, ज्यांच्याशी ते शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांना गर्भवती करू इच्छितात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना ५ ते २० हजार रुपये सुरक्षा ठेव म्हणून जमा करण्यास सांगितले जायचे. महिला जितकी सुंदर असेल तितकी सुरक्षा रक्कम जास्त द्यावी लागत होती. एवढेच नाही तर या सायबर ठगांनी यशस्वी गर्भधारणा झाल्यास १३ लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातील असे आश्वासनही दिले. गर्भधारणा नाही झाली तरी त्यांना बक्षीस म्हणून ५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले जात होते. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात पोहोचेल, असे देखील आमिष दिले जायचे. दरम्यान, सेक्सच्या आहारी गेलेले तरुण अशा अमिषात अडकून त्यांची फसवणूक केली जात होती. पोलिसांनी आरोपींकडून ९ मोबाईल फोन, २ प्रिंटर आणि अनेक डाटाशीट जप्त केल्या आहेत.

WhatsApp channel

विभाग