मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Salman Khan : सिद्धू मूसवालाप्रमाणेच लॉरेन्स बिश्नोई टोळी सलमान खानची करणार होते हत्या! पाकिस्तानातून मागवली शस्त्रे

Salman Khan : सिद्धू मूसवालाप्रमाणेच लॉरेन्स बिश्नोई टोळी सलमान खानची करणार होते हत्या! पाकिस्तानातून मागवली शस्त्रे

Jul 02, 2024 08:33 AM IST

Lawrence Bishno and Salman Khan : पोलिसांनी गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या आरोपपत्रात सलमान खानवर हल्ल्याची योजना आणि पळून जाण्याच्या मार्गांचा खुलासा तपासात झाला आहे. या प्रकरणी ३५० पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आले होते. यात लॉरेन्स गँगच्या ५ जणांच्या नावांचा समावेश आहे.

सिद्धू मूसवालाप्रमाणेच लॉरेन्स बिश्नोई टोळी सलमान खानचा करणार होते गेम! पाकिस्तानातून मागवली शस्त्रे
सिद्धू मूसवालाप्रमाणेच लॉरेन्स बिश्नोई टोळी सलमान खानचा करणार होते गेम! पाकिस्तानातून मागवली शस्त्रे

Lawrence Bishno and Salman Khan : लॉरेन्स बिश्नोई टोळीने पंजाबी गायक सिद्धू मूसवालाप्रमाणे चित्रपट अभिनेता सलमान खानची हत्या करण्याची योजना आखली होती, असा धक्कादायक खुलासा पनवेल पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून झाला आहे. पोलिसांनी ही माहिती गुप्तचर विभाग व संशयितांच्या मोबाईल फोन टॉवर लोकेशन्सच्या विश्लेषणाद्वारे गोळा केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पनवेल पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये, लॉरेन्स गँगने सलमानला ठार मारण्यासाठी एके-४७सह अनेक शस्त्रे पाकिस्तानातून मागवल्याची योजना आखली होती. आरोपपत्रानुसार, सिद्ध मूसबाला यांच्या हत्येप्रमाणेच हा हल्ला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान किंवा सलमान पनवेल फार्महाऊसमधून बाहेर पडताना घडवून आणण्याची योजना होती.

ट्रेंडिंग न्यूज

विशेष बाब म्हणजे पोलिसांनी गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या आरोपपत्रात हल्ल्याची योजना आणि पळून जाण्याच्या योजनेचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. तब्बल ३५० पानांच्या या आरोपपत्रात लॉरेन्स गँगच्या ५ जणांची नावे आहेत. यामध्ये अजय कश्यप (वय २८), गौतम विनोद भाटिया (वय २९), वास्पी महमूद खान उर्फ ​​चायना (वय ३६), रिजवान हसन उर्फ ​​जावेद खान (वय २५) आणि दीपक हवसिंग उर्फ ​​जॉन वाल्मिकी (वय ३०) यांचा समावेश आहे.

एप्रिलमध्ये पनवेलचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना लॉरेन्स टोळी सलमानवर हल्ल्याचा कट रचत असल्याची माहीजती गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती. त्यानंतर तपासात समोर आले की, लॉरेन्सने सलमानवर हल्ला करण्यासाठी टोळीला २५ लाख रुपयांचे कंत्राट दिले होते. रिपोर्टनुसार, या टोळीने १५-१६ लोकांचा व्हॉट्सॲप ग्रुप देखील तयार केला होता. या ग्रुपमध्ये गोल्डी ब्रार आणि अनमोल बिश्नोई हे देखील सदस्य होते.

पाकिस्तानकडून शस्त्रे

पोलिसांनी सुखा शूटर आणि पाकिस्तानच्या डोगरची ओळख पटवली आहे. हे दोघे आरोपींना एक ४७ रायफल आणि एम १६ किंवा एम ५ बंदूक पुरवणार होते. कश्यपने सलमाल खानला मारण्यासाठी रेकी देखील केली होती. यासाठी त्याने सलमानच्या फार्महाऊसजवळ एक घर भाड्याने घेतले होते. तर काहींनी आधीच सलमानचे फार्महाऊस, गोरेगावमधील फिल्मसिटी आणि वांद्रे येथील घराची रेकी केली होती. मूसवाला यांची २९ मे २०२२ रोजी हत्या झाली होती.

WhatsApp channel
विभाग