Uttar Padesh Crime : इंजिनीअर अतुल सुभाष यांच्याप्रमाणेच पत्नी आणि सासूला वैतागलेल्या आणखी एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या पीडित तरुणाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या ठिकाणी त्याची मृत्यूशी लढाई सुरू आहे. मेरठच्या लिसरीगेट भागात ही घटना घडली. या प्रकरणी तरुणाच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच पत्नी व सासूवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बेंगळुरू येथे इंजिनीअर असलेल्या अतुल सुभाष याने पत्नी आणि सासरच्या मंडळींवर पैशांसाठी छळ केल्याचा आरोप करत गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी अतुलने दीड तासाचा व्हिडिओ आणि २४ पानांची सुसाईड नोट लिहून पत्नी आणि सासू-सासऱ्यांवर अनेक गंभीर आरोप केले होते. यानंतर बेंगळुरू पोलिसांनी अतुल सुभाष यांची पत्नी, सासू आणि मेहुणा यांना अटक करून तुरुंगात पाठवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापड व्यापारी अर्शद आणि त्याचा भाऊ इरशाद तारापुरी येथे भाड्याच्या घरात राहतात. अर्शद बऱ्याच काळापासून पत्नी सुमैलापासून विभक्त आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये अनेक घटस्फोटाबाबत अनेक चर्चा झाल्या. यावर तोडगा काढण्याऐवजी सासरचे लोक अर्शदवर दबाव टाकत पैसे उकळण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप आहे. यामुळे अर्शद हा तणावात होता.
सोमवारी अर्शदचा पत्नी सुमैलासोबत पुन्हा वाद झाला. या वादाची माहिती मिळताच अर्शदचा मेहुणा बबलूनेही कुटुंबीयांसह धाव घेत त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वाद एवढा वाढला की अर्शद रागाच्या भरात घराच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन खाली उडी मारली.
त्याने उडी मारताच घरात गोंधळ उडाला. त्याच्या नातेवाइकांनी त्याला तातडीने जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात भरती केले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्याला हापुड रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती ही गंभीर आहे.
अर्शदने छतावरून उडी मारल्यानंतर कुटुंबात खळबळ उडाली. त्याने सुमैलाशी वाद घालण्यास सुरुवात केली. सुमैलानेही त्याच्याशी वाद घातला. तसेच तिच्या कुटुंबीयांना बोलावून घेतले. वडील रियाजुद्दीन आणि आई शबिया यांनीही अर्शदच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार वाद सुरू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्शद हा कापड व्यावसायिक आहे. तो आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्यासोबत त्याचा भाऊ इरशादही राहत होता. सुमैलाला हे आवडत नव्हते. यामुळे ती अर्शदवर स्वत:चे घर विकत घेण्यासाठी दबाव टाकत होती. या वादादरम्यान घराचा मुद्दाही अनेकदा समोर आला, पण अर्शदने कसेबसे हे प्रकरण टाळले. काही दिवसांपासून त्याची सासू व पत्नी या साठी त्याच्यावर दबाव वाढवत होते. यामुळे तो तणावात होता.
सीओ कोतवाली आशुतोष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये यवरून नेहमी वाद होत होते. सोमवारी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. यावेळी अर्शदने टोकाचे पाऊल उचलत छतावरून उडी मारली.
संबंधित बातम्या