मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : घराच्या छतावर रील बनवत होती तरुणी, त्याचवेळी आकाशातून पडली वीज, पुढं जे घडलं ते पाहा व्हिडिओमध्ये

Viral Video : घराच्या छतावर रील बनवत होती तरुणी, त्याचवेळी आकाशातून पडली वीज, पुढं जे घडलं ते पाहा व्हिडिओमध्ये

Jun 29, 2024 02:12 PM IST

Lightning Video : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसते की, तरुणी मोबाईल सेट करून पावसात डान्सची रील बनवत असते. वीज कोसळत असलेले दृष्य मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

रील बनवताना तरुणीच्या जवळच कोसळली वीज
रील बनवताना तरुणीच्या जवळच कोसळली वीज

Viral Video: सोशल मीडियावररील बनवण्याची क्रेज तरुणाईमध्ये पाहायला मिळत आहे. अनेकदा रील बनवण्याच्या नादात आपले जीव धोक्यात घातले जात आहेत. अशाच अनेक घटना सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तरुणी पावसात डान्स रील बनवण्यासाठी घराच्या छतावर चढते. त्याचवेळी आकाशातून वीज कोसळते. विजांच्या कडकडाट ऐकून तरुणी तेथून पळून जाते. तरुणी मोठ्या दुर्घटनेतून थोडक्याच वाचली. हे दृष्य खूपच भयावह आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आकाशातून वीज कोसळण्याची घटना बिल्कुल अशीच आहे, जसे भूत-प्रेतांच्या गोष्टी, ज्यांनी पाहिले ते विश्वास ठेवतात आणि ज्यांनी पाहिले नाही ते विश्वास करत नाहीत. जे लोक आकाशातून वीज कोसळण्याच्या घटनेवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्यासाठी बिहारमधील सीतामढी येथून एक भयंकर प्रकार समोर आला आहे. सीतामढी येथील बेला पोलीस ठाणे क्षेत्रातील सिरसिया गावात एक तरुणी घराच्या छतावर रील बनवत होती. पावसात रील बनवताना तिच्यापासून काही अंतरावर वीज कोसळते. हे पाहून तरुणी घाबरून पळून जाते. ही घटना कॅमऱ्यात कैद झाली आहे.

भयावह व्हिडिओ व्हायरल -

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, मुलगी रील बनवत असताना अचानक आकाशातून वीज कोसळते. तरुणीपासून काही अंतरावर वीज कोसळते. विजेच्या कडकडाटाने तरुणीची भातीने गाळण उडते व ती तेथून पळून गेली. ही घटना मंगळवारी घडली आहे. या व्हिडिओने प्रत्येकाच्या मनात दहशत निर्माण केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसते की, तरुणी मोबाईल सेट करून पावसात डान्सची रील बनवत असते. वीज कोसळत असलेले दृष्य मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

घटनेत थोडक्यात वाचली मुलगी -

व्हिडिओत दिसत असलेल्या मुलीचे नाव सानिया हे. व्हिडिओमध्ये दिसते की, सानियाचे नशीब चांगले म्हणून वीज तिच्या अंगावर न कोसळता काही अंतरावर पडली. या घटनेनंतर सानिया सुखरुप आहे, मात्र ती खूपच घाबरलेली आहे. निसर्गाचे रुद्र रुप सानियाने आपल्या डोळ्याने पाहिले आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, वीज कोसळलेल्या ठिकाणी अचानक आग लागली.

WhatsApp channel
विभाग