Viral News : बिबट्याने स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ केली काळवीटाची शिकार; मित्राच्या मृत्यूमुळे आणखी ७ जणांनी सोडला जीव
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : बिबट्याने स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ केली काळवीटाची शिकार; मित्राच्या मृत्यूमुळे आणखी ७ जणांनी सोडला जीव

Viral News : बिबट्याने स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ केली काळवीटाची शिकार; मित्राच्या मृत्यूमुळे आणखी ७ जणांनी सोडला जीव

Jan 06, 2025 06:14 AM IST

Viral News : गुजरात जवळील शूळपानेश्वर अभयारण्यात बिबट्याने एका काळ्या हरणाची शिकार केली. या हरणाच्या मृत्यूच्या विरहात कळपातील ७ हरणांनी आपला जीव सोडल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना व्हायरल झाली आहे.

बिबट्याने स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ केली काळवीटाची शिकार; मित्राच्या मृत्यूमुळे आणखी ७ जणांनी सोडला जीव
बिबट्याने स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ केली काळवीटाची शिकार; मित्राच्या मृत्यूमुळे आणखी ७ जणांनी सोडला जीव

Viral News : गुजरातच्या शूलपणेश्वर वन्यजीव अभयारण्यात एक अतिशय विचित्र आणि वेदनादायक घटना घडली आहे. या अभ्यारण्यात एका बिबट्याने एका काळवीटाची शिकार केली. आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याने व त्याचा विरह सहन न झाल्याने कळपातील आणखी ७ काळवीटांनी त्यांचा जीव सोडला. या घटनेला प्राणीतज्ञांनी देखील दुजोरा दिला आहे. ही घटना १ जानेवारी रोजी घडली आहे. वनाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

काळवीट हा अत्यंत संवेदनशील प्राणी मानला जातो. त्याचबरोबर हा प्राणी बिश्नोई समाजासाठी पूजनीय आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, एक बिबट्या अभयारण्याची हद्द ओलांडून जंगलात आला. केवडिया वनक्षेत्रात त्याने काळवीटांची शिकार केली. हा परिसर स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ आहे.

दरम्यान, जंगलात आणखी सात काळवीटांचे मृतदेह सापडले. आपल्या जोडीदाराच्या दु:खात त्या हरणांनीही जीव सोडल्याचे मानले जात आहे. आठही काळवीटांचे शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आजूबाजूच्या जंगलात बिबटे असून सफारी क्षेत्रात बिबट्या शिरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या उद्यानात ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्या द्वारे या वानक्षेत्रात सातत्याने लक्ष ठेलवं जातं. बिबट्या या परिसरात घुसला होता. या बाबत सुरक्षा रक्षकांना सतर्क करण्यात आले होते. त्यानंतर बिबट्या पळून गेला. मात्र, हा बिबट्या जवळच कुठेतरी लपून बसला होता. या घटनेमुळे हे उद्यान ४८ तास बंद ठेवण्यात आले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर