लॉरेंस बिश्नोई गँगचा शार्प शुटर राजन यांची निघृण हत्या करण्यात आली आहे. तो कुरुक्षेत्र येथील मेहरा गावातील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार त्याचे हात-पाय बांधून त्यांच्या शरीराची गोळ्यांनी चाळण करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला. पोलिसांनी सोमवारी सांगितले की, अनेक गँग वॉरमध्य सामील असणाऱ्या राजनचा मृतदेह यमुनानगर जिल्ह्यातील रस्त्याकडेला आढळला. बंबीहा गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे.
राजनच्या चुलत भावाने सांगितले की, राजनचा कुटूंबाशी काही संबंध नव्हता. त्याचा मृतदेह आढळला तेव्हा त्याचे हात पाय बांधले होते. त्याचबरोबर त्याच्या शरीराचे अनेक अवयव गायब होते. मिळालेल्या माहितीनुसार राजनचे लग्न झाले होते व त्याला एक मुलगाही आहे. मात्र गेल्या एक वर्षापासून तो घरी गेला नव्हता.
देंवेंद्र बंबीहा नावाच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट करत या हत्येची जबाबदारी घेतली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, रात्री कुरुक्षेत्रच्या राजनची हत्या झाली. ही हत्या लकी पटियाल आणि अर्श डल्ला यांच्या सांगण्यावरून झाली. लॉरेन्स आणि विष्णू यांच्या सांगण्यावरून त्यांनी लक्ष्मण देवासी संचौर यांची हत्या केली होती.
लॉरेन्सच्या मुलाखतीबाबत हा मोठ्या फुगिरीने सांगत होता. अनेक वर्षांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तुम्ही गोगामेडी आणि सिद्धू मूसवाला यांना मारले. तू स्वतःला खूप रागीट समजतोस, आता आम्ही तुला सांगू शत्रुत्व म्हणजे काय, अशी पोस्ट फेसबूकवर करण्यात आली आहे.