लॉरेन्स बिश्नोई LAW चा होता विद्यार्थी, कसा बनला गुन्हेगारी जगताचा बादशहा; पंजाबमधील ‘ती’ निवडणूक ठरली कारणीभूत
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  लॉरेन्स बिश्नोई LAW चा होता विद्यार्थी, कसा बनला गुन्हेगारी जगताचा बादशहा; पंजाबमधील ‘ती’ निवडणूक ठरली कारणीभूत

लॉरेन्स बिश्नोई LAW चा होता विद्यार्थी, कसा बनला गुन्हेगारी जगताचा बादशहा; पंजाबमधील ‘ती’ निवडणूक ठरली कारणीभूत

Published Oct 30, 2024 03:39 PM IST

लॉरेन्स बिश्नोईच्या गुन्हेगारी विश्वातील प्रवेश २००८ सालचा मानला जातो. १२ फेब्रुवारी १९९२ रोजी पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यात जन्मलेल्या लॉरेन्सने २००७ मध्ये पंजाब विद्यापीठात प्रवेश घेतला. कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी तो महाविद्यालयात गेला आणि तेथील विद्यार्थी राजकारणाचा भाग बनला.

लॉरेन्स बिश्नोई
लॉरेन्स बिश्नोई

बलकरण बरार उर्फ लॉरेन्स बिश्नोई यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची हत्या, राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला हल्ला आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमक्या या  गँगस्टरशी जोडल्या जात आहेत. त्याची तुलना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी केली जात आहे. परिस्थिती अशी झाली आहे की, सोशल मीडिया प्रोफाइलवर डीपी टाकणाऱ्यांवरही पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. दहा वर्षांपासून तुरुंगात असलेला लॉरेन्स इतका शक्तिशाली कसा आहे, हा प्रश्न आहे.

लॉरेन्सच्या नेटवर्कमध्ये ७०० हून अधिक शॉर्प शूटर असल्याचे मानले जाते, जे देश-विदेशात पसरलेले आहेत. तर त्याच्यावर ७५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. २०१४ पासून तो गुजरातमधील साबरमती तुरुंगात कैद आहे.

लॉरेन्स बिश्नोई कसा बनला इतका शक्तिशाली -

लॉरेन्सची गुन्हेगारी विश्वात २००८ साली प्रवेश झाल्याचे म्हटले जााते. १२ फेब्रुवारी १९९२ रोजी पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यात जन्मलेल्या लॉरेन्सने २००७ मध्ये पंजाब विद्यापीठात प्रवेश घेतला. कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी तो महाविद्यालयात गेला आणि तेथील विद्यार्थी राजकारणाचा भाग बनला. पुढच्याच वर्षी त्यांचा मित्र रॉबिन बरार याने विद्यार्थी परिषदेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

रिपोर्टनुसार, निवडणुकीदरम्यान लॉरेन्सने ब्रार यांच्या परवानाधारक बंदुकीने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर त्याला कलम ३०७ अन्वये प्रथमच तुरुंगात जावे लागले. मात्र, दोन महिन्यांनंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगात असताना मोठ्या गुन्हेगारांशी त्याची मैत्री झाली असे मानले जाते.

निवडणूक हरला व पुन्हा जिंकला -

२०१० मध्ये लॉरेन्सने स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली, पण त्याचा पराभव झाला. यानंतर त्याच्या साथीदारांनी विजेत्याला जोरदार मारहाण केली आणि त्याचा परिणाम असा झाला की लॉरेन्स पुन्हा तुरुंगात पोहोचला. पुढच्याच वर्षी त्याने पुन्हा निवडणूक लढवली आणि अध्यक्ष झाला. इथूनच त्याची गोल्डी ब्रारसोबत ओळख झाली, असे मानले जाते. सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातही गोल्डीचे नाव समोर आले होते.

सलमान खानला मारायला गेला लॉरेन्सचा मित्र -

गोल्डी आणि लॉरेन्स यांनी पंजाबमध्ये छोट्या छोट्या निवडणुका लढवायला सुरुवात केली. कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर लॉरेन्सने विद्यार्थी राजकारणात राहण्यासाठी एक टोळी तयार केली, ज्यात त्याचा मित्र संपत नेहराचाही समावेश होता. विशेष म्हणजे २०१८ मध्ये नेहरा सलमान खानला मारण्याच्या इराद्याने मुंबईत पोहोचला होता, पण नंतर त्याला अटक करण्यात आली होती.

रिपोर्टनुसार , २०१३ मध्ये पंजाबमध्ये एका महाविद्यालयीन निवडणुकीत लॉरेन्स समर्थित उमेदवार निवडणुकीत पराभूत झाला तेव्हा त्याने विजेत्याच्या हत्येचे आदेश दिले होते. लखनौ महापालिका निवडणुकीत मित्राच्या नातेवाईकाविरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला ठार मारण्याचे आदेशही त्याने दिले होते.

सलमानला मारण्याचा प्लान -

२०१८ मध्ये लॉरेन्सने पहिल्यांदा सलमान खानच्या हत्येची योजना आखली होती आणि नेहरावर हे काम सोपवले होते. लांब पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांअभावी तो ही योजना अंमलात आणू शकला नाही, असे बोलले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, मूसेवाला यांच्या हत्येभोवती सलमानला दुसऱ्यांदा ठार मारण्याचा कट रचला गेला होता. त्याचवेळी तिसरा प्रयत्न गोल्डीने केला आणि शूटर्सने सलमानच्या घराची रेकीही केली. मात्र, पोलिसांनी हा कट हाणून पाडला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर