Law Of India: भारतात कुराण किंवा कोणत्याही धर्माचा ग्रंथ जाळल्यास शिक्षा काय? वाचा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Law Of India: भारतात कुराण किंवा कोणत्याही धर्माचा ग्रंथ जाळल्यास शिक्षा काय? वाचा

Law Of India: भारतात कुराण किंवा कोणत्याही धर्माचा ग्रंथ जाळल्यास शिक्षा काय? वाचा

Jan 31, 2025 10:23 AM IST

Explainer: भारतात कुराण किंवा कोणत्याही धर्माचा ग्रंथ जाळल्यास किंवा त्याचा अपमान केल्यास कोणती शिक्षा केली जाते, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

भारतात कुराण किंवा कोणत्याही धर्माचा ग्रंथ जाळल्यास शिक्षा काय? वाचा
भारतात कुराण किंवा कोणत्याही धर्माचा ग्रंथ जाळल्यास शिक्षा काय? वाचा

Do you Know: स्वीडनमधील मशिदीसमोर इस्लामी ग्रंथ कुराण जाळणाऱ्या सलवान मोमिका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सलवान मोमिकाने २०२३ मध्ये कुराणच्या अनेक प्रती जाळल्या होत्या.सलवानच्या अशा कृत्यामुळे अनेक मुस्लीम राष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सलवानचा मृतदेह बुधवारी रात्री उशीरा त्याच्या राहत्या घरात आढळून आला. या घटनेनंतर असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, जर भारतात एखाद्या व्यक्तीने कोणत्याही धर्माचे ग्रंथ जाळले किंवा त्याचा अपमान केला तर, त्याला कोणती शिक्षा दिली जाईल, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

मोमिका हा इस्माल धर्मविरोधी होता. त्याने २०२३ मध्ये ईदच्या निमित्ताने स्वीडनची राजधानी स्टॉकहोममधील सर्वात मोठ्या मशिदीसमोर कुराणचा अपमान करून जाळून टाकले. त्याच्या अशा कृत्यामुळे तो जगभरात चर्चेत आला. दरम्यान, बुधवारी रात्री मोमिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण जगभरात खळबळ माजली.

भारतातील कायदा काय सांगतो?

भारतात कोणत्याही धर्माचे पुस्तक जाळल्यास किंवा धर्माचा अपमान केल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम २९५ अंतर्गत, कोणत्याही धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने प्रार्थनास्थळ किंवा पवित्र वस्तू नष्ट करणे दंडनीय आहे. याशिवाय, धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने केलेले कोणतेही भाषण, लेखन किंवा चिन्ह देखील दंडनीय आहे.

किती वर्षांची शिक्षा?

भारतात धर्माविरुद्ध कोणतेही कृत्य केल्यास कोणती शिक्षा दिली जाते, हे जाणून घेऊयात. 

-आयपीसीच्या कलम २९५ अंतर्गत, कोणत्याही धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने प्रार्थनास्थळ किंवा पवित्र वस्तू नष्ट केल्यास दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात.

-भारतीय दंड संहितेच्या कलम २९५अ अंतर्गत, कोणत्याही धार्मिक श्रद्धेचा अपमान करण्याच्या उद्देशाने केलेले कोणतेही जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्य तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

-भारतीय दंड संहितेच्या कलम २९८ अंतर्गत, धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे किंवा धार्मिक प्रतीकांचा अपमान करणे किंवा त्यांना नुकसान पोहोचवणे, यासाठी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर