Constitution of India: गेल्या वर्षी एका बारमध्ये अश्लील डान्स करून लोकांना त्रास दिल्याच्या आरोपाखाली दिल्लीतील एका न्यायालयाने सात महिलांची निर्दोष मुक्तता केली आहे. या महिलांविरोधात प्रकरणी पहाडगंज पोलीस ठाण्यात भादंविकलम २९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर सुनवाणी करताना तीस हजारी कोर्टाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नीतू शर्मा म्हणाल्या की, या महिलांवरील गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.
तोकडे कपडे परिधान करणे गुन्हा नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी डान्स करणे गुन्हा नाही, असे बार अँड बेंचने म्हटले आहे. डान्स करणाऱ्या तेव्हाच शिक्षा होऊ शकते, जेव्हा त्यांच्यामुळे इतरांना त्रास झाला असेल. एका उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपण या भागात गस्त घालत असल्याचा दावा त्यांनी केला. बारमध्ये गेल्यावर त्याने पाहिले की, लहान कपडे घातलेल्या काही मुली अश्लील गाण्यांवर नाचत आहेत.
न्यायालयाने स्पष्ट केले की, या महिलांनी केलेल्या डान्समुळे इतरांना त्रास झाल्याचे पोलीस अधिकाऱ्याने कुठेही नमूद केले नाही. सरकारी पक्षाच्या दोन साक्षीदारांनी सांगितले की, ते मनोरंजनासाठी त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांना या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नव्हती. पोलिसांनी कथा रचली हे स्पष्ट आहे. एसआय धर्मेंद्र यांचा दावा मान्य केला तरी त्यातून दोष सिद्ध होणार नाही. त्यावेळी गस्तीवर असल्याच्या दाव्याचा पुरावा म्हणून एसआय कोणतेही ड्युटी रोस्ट किंवा डीडी एन्ट्री दाखवू शकले नाहीत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
संबंधित बातम्या