Landslide : एका गावात झालेल्या भूस्खलनात २००० लोक जिवंत गाडले! कशामुळे कोसळली नैसर्गिक आपत्ती?-landslide such a way that 2000 people were buried alive papua new guinea ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Landslide : एका गावात झालेल्या भूस्खलनात २००० लोक जिवंत गाडले! कशामुळे कोसळली नैसर्गिक आपत्ती?

Landslide : एका गावात झालेल्या भूस्खलनात २००० लोक जिवंत गाडले! कशामुळे कोसळली नैसर्गिक आपत्ती?

May 27, 2024 03:55 PM IST

Landslide in Papua New Guinea : पापुआ न्यू गिनीची राजधानी पोर्ट मोरेस्बीपासून सुमारे६००किलोमीटर अंतरावर असलेल्या एन्गा प्रांतातील गावात झालेल्या भूस्खलनात २ हजाराहून अधिक नागरिक दबले गेले आहेत.

पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन
पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन

Landslide in Papua New Guinea : पापुआ न्यू गिनीच्या काओकलाम गावात झालेल्या भूस्खलनात २०००  हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पापुआ न्यू गिनीची राजधानी पोर्ट मोरेस्बीपासून सुमारे ६०० किलोमीटर अंतरावर असलेल्या एन्गा प्रांतातील गावात ही शुक्रवारी ही घटना घडली. सीएनएन वृत्तवाहिनीने देशाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या हवाल्याने या गोष्टीची पुष्टी केली आहे. सांगितले जात आहे की, भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली २ हजाराहून अधिक लोक जिवंत गाडले गेले. सरकारने सांगितले की, मदत व बचाव कार्यासाठी आंतराराष्ट्रीय पातळीवर मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. 

भूस्खलनापूर्वी पापुआ न्यू गिनीमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.  आयओएम संघटनेने या भूस्खलनात ६७० लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली होती. सरकारचा आकडा संयुक्त राष्ट्राच्या या एजन्सीच्या आकड्याच्या तिप्पट आहे. संयुक्त राष्ट्राचे स्थानिक समन्वयकांना रविवारी लिहिलेल्या पत्रात दक्षिण प्रशांत द्वीप राष्ट्र के राष्ट्रीय आपदा केंद्राचे कार्यवाहक संचालकांनी म्हटले आहे की, या भूस्खलनात २००० हून अधिक लोक जिवंत गाडले गेले व मोठा विनाश झाला आहे.

भूस्खलनानंतर बळींची संख्येचा अनुमान वेगवेगळा असून असून स्पष्ट झाले नाही की, अधिकाऱ्यांनी पीड़ितांच्या संख्येचे मोजमाप कसे केले. ऑस्ट्रेलियाने पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलनस्थळावर मदतीसाठी विमान आणि अन्य उपकरण पाठवण्याची सोमवारी तयारी केली आहे. पापुआ न्यू गिनीच्या डोंगराळ भागात रात्रभर झालेल्या पावसाने भूस्खलन झाले व याखाली शेकडो नागरिक दबले गेले. 

ऑस्ट्रेलियन संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांनी म्हटले की, त्यांचे अधिकारी पापुआ न्यू गिनीच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. या भूस्खलनात मृत्यू झालेल्या सहा लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. 

यूएनला न्यू गिनी सरकारकडून लिहिण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, कमीत कमी २ हजार लोक जिवंत गाडले गेले आहेत. त्याचबरोबर अनेक इमारती व उद्यानांचे नुकसान झाले आहे. या भूस्खलनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचेही मोठे नुकसान झाले आहे. सांगितले जात आहे की, चार फुटबॉलचे मैदान होतील इतके भूस्खलन झाले आहे. या ढिगाऱ्याखाली यांबाली गावातील जवळपास १५० गाव दबले गेले. प्रशासनाने सांगितले की, या परिसरात अजूनही धोका आहे.

का झाले भूस्खलन ?


तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्यानंतर मदत व बचावकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना समजत नाहीय की, खोदकाम कुठून सुरू करावे व लोकांचा जीव वाचवावा. अजूनपर्यंत भूस्खलनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. तरीही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या नैसर्गिक आपत्तीमागे भूकंप कारणीभूत असू शकतो. त्याचबरोबर जेथे भूस्खलन होते तेथे पाऊसही मोठ्य प्रमाणात पडतो. अति प्रमाणात कोसळलेला पाऊसही याचे कारण असू शकतो. अधिक पावसामुळे डोंगराळ भागात पाणी साचून जमीन कोसळली असेल.

Whats_app_banner