Bihar Politics : नितीश कुमारांचा खेळ बिघडवण्याची यादव पितापुत्रांची रणनीती, तेजस्वी सीएम होणार?-lalu tejashwi active in spoiling nitish game rjd eyes are on these mlas new political equation under process ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bihar Politics : नितीश कुमारांचा खेळ बिघडवण्याची यादव पितापुत्रांची रणनीती, तेजस्वी सीएम होणार?

Bihar Politics : नितीश कुमारांचा खेळ बिघडवण्याची यादव पितापुत्रांची रणनीती, तेजस्वी सीएम होणार?

Jan 26, 2024 05:36 PM IST

Bihar Politics News : सातत्यानं राजकीय आघाड्या बदलणाऱ्या नितीश कुमार यांना धडा शिकवण्यासाठी लालू यादव व तेजस्वी यादव यांनी कंबर कसली आहे.

Tejashwi Yadav - Lalu Yadav
Tejashwi Yadav - Lalu Yadav

Nitish Kumar vs Tejashwi Yadav : नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दल पुन्हा भाजपसोबत जाण्याची दाट शक्यता आहे. भाजपनंही नितीश कुमार यांना सोबत घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळं बिहारमधील महागठबंधन सरकार अडचणीत आलं आहे. मात्र, सतत कोलांटउड्या मारणाऱ्या नितीश यांना यावेळी दणका देण्याची यादव पितापुत्रांचा प्रयत्न आहे. नितीश भाजपसोबत गेले तरी राज्यात महागठबंधन सरकार कायम राखण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाचे ७९ आमदार आहेत. काँग्रेसचे १९ आमदार आणि डाव्या पक्षांचे १६ आमदार आहेत. हा एकत्रित आकडा ११४ वर पोहोचतो. सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा १२२ आहे. या आकड्यापासून महागठबंधन फक्त आठ आमदार दूर आहे. लालूंच्या गोटातून हे आठ आमदार मिळवण्याची तयारी सुरू झाली आहे.

Bihar Politics : चक्रावून टाकणारं राजकारण! नितीश कुमार पुन्हा भाजप सोबत सरकार स्थापण्याची शक्यता

राष्ट्रीय जनता दलाची नजर छोट्या पक्षांवर आहे. लालू यादव यांच्याशी जवळीक असलेले संयुक्त जनता दलाचे काही आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. तेजस्वी यांना मुख्यमंत्री करण्यासाठी लल्लन सिंह यांनी अलीकडंच १२ आमदारांसह आरजेडी नेत्यांची बैठक आयोजित केली होती. अर्थात, ललन सिंह यांनी ही चर्चा नंतर फेटाळून लावली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरजेडीची जीतन राम मांझी यांच्या आमदारांवरही लक्ष ठेवून आहे. याशिवाय, ओवेसींच्या एआयएमआयएम पक्षाचे एकमेव आमदार अख्तरुल इमान यांना आपल्या बाजूनं घेण्याचा आरजेडीचा प्रयत्न आहे. अपक्ष आमदार सुमित सिंह यांचंही मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी छोट्या पक्षांच्या आमदारांना मोठ्या ऑफर दिल्या जात आहेत. तेजस्वी यादव यांनी आज दुपारी लालूंची भेट घेऊन या संदर्भात प्रदीर्घ चर्चा केली.

ठाकरे गटाकडून लोकसभेची तयारी सुरू, राज्यात ८०० किलोमीटरच्या 'मातृतीर्थ ते शिवतीर्थ' यात्रेची घोषणा

मांझी यांचा वेगळाच दावा

महागठबंधन आणि एनडीए या दोन्ही आघाड्यांच्या तंबूत जोरदार हालचाली सुरू असताना माजी मुख्यमंत्री व हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी मोठं विधान केलं आहे. बिहारमध्ये पुन्हा मोठा खेळ होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या ऑफरबद्दल त्यांना विचारलं असता त्यांनी ती शक्यता फेटाळून लावली. 'ही चर्चा निरर्थक आहे. आमची निष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती आहे आणि ती कायम राहील. आम्ही कुटील राजकारण करत नाही. भाजप जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल, असं मांझी म्हणाले.

Whats_app_banner