Trending news : प्रेमासाठी कायपण! महिला पोलीस निरीक्षक हवालदारासोबत गेली पळून, निवडणूक ड्युटीदरम्यान जुळले सूत!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Trending news : प्रेमासाठी कायपण! महिला पोलीस निरीक्षक हवालदारासोबत गेली पळून, निवडणूक ड्युटीदरम्यान जुळले सूत!

Trending news : प्रेमासाठी कायपण! महिला पोलीस निरीक्षक हवालदारासोबत गेली पळून, निवडणूक ड्युटीदरम्यान जुळले सूत!

May 14, 2024 06:15 PM IST

Police Love Affair : न सांगता ड्यूटीवर गैरहजर राहिल्याने दोघांनीही सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. आता पोलिसांना माहिती मिळाली आहे की, दोघांनी लग्न केले आहे.

महिला पोलीस निरीक्षक हवालदारासोबत गेली पळून
महिला पोलीस निरीक्षक हवालदारासोबत गेली पळून

पोलीस महानिरीक्षकांच्या (आयजी) कार्यालयात तैनातमहिला सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) पोलीस शिपायासमोबत पळून गेली आहे. दोघे ड्यूटीवर जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र ते कार्यालयात ह्युटीवरही हजर झाले नाहीत व घरीही परतले नाहीत. महिला एएसआयच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठून ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. दोघांचे मोबाईलही बंद येत आहेत. महिला एएसआयच्या नातेवाईकांनी आयजी अरविंद सक्सेना यांची भेट घेऊन सांगितले की, त्यांची मुलगी व पोलीस शिपायामध्ये प्रेमसंबंध होते. दोघे लग्न करणार होते. मात्र दोघांची जात भिन्न असल्याने त्यांनी दोघांच्या लग्नाला परवानगी दिली नव्हती.

न सांगता ड्यूटीवर गैरहजर राहिल्याने दोघांनीही सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. आता पोलिसांना माहिती मिळाली आहे की, दोघांनी आर्य समाजात लग्न केले आहे. आयजीचे म्हणणे आहे की, जर दोघांना लग्न करायचे होते तर ते माझ्यासमोर येऊन सांगू शकले असते. त्यांना माहिती देऊ शकले असते. मात्र ड्युटीवर न सांगता गैरहजर रहायला नको पाहिजे होते. ग्वाल्हेर विभागाच्या आयजी कार्यालयात गेल्या पाच वर्षापासून महिला एएसआय निशा जैन आणि शिपाई अखंड प्रताप सिंह यादव तैनात आहेत.

मतदानादिवशी लागली होती ड्यूटी -
७मे रोजी लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या चप्प्यात मतदान झाले. त्यावेळी त्यांची ड्यूटी लागली होती. मतदानादिवशी दोघांनी सोबतच पेट्रोलिंग केले. सांगितले जात आहे की, त्याचदिवशी दोघांनी पळून जाण्याचा प्लॅन बनवला. मतदान पार पडल्यानंतर दोघे घरी पोहोचले व दुसऱ्या दिवशी ड्यूटीवर जाण्यासाठी निघाले मात्र तेव्हापासून ते बेपत्ता झाला. दोघांचे फोनही बंद येत आहेत. आयजी कार्यालयाकडून दोघांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नव्हता. त्यानंतर आयजी अरविंद सक्सेना यांनी दोघांना निलंबित केले.

लग्नासाठी जात बनली होती अडथळा

महिला एएसआयचे कुटूंबीय आयजी ऑफिसमध्ये पोहोचले व मुलीला शोधून काढण्याची विनंती करू लागले. महिला एएसआय कंपू परिसरात रहात होती. त्यामुळे तिच्या कुटूंबीयांनी कंपू पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यांनी पोलीस महानिरीक्षकांना सांगितले की, निशा आणि अखंड लग्न करणार होते. मात्र दोघांची जात वेगळी असल्याने कुटूंबीयांनी लग्नास संमती दिली नाही. त्यामुळे ते घरातून पळून गेले आहेत. आता पोलिसांनी माहिती मिळाली आहे की, दोघांनी लग्न केले आहे. तसेच दोघे दिल्लीत असल्याचेही समोर आले आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर