Dogs Fight With King Cobra: छत्तीसगडमधील मुंगेली येथे रात्रीच्या अंधारात एका घराच्या अंगणात शिरलेल्या किंग कोब्राशी लढणाऱ्या दोन पाळीव कुत्र्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. सुरुवातीला कुत्र्यांनी किंग कोब्राला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. पण तो तिथेच थांबला आणि कुत्रे आणि विषारी सापात युद्ध सुरू झाले. या लढाईत विषारी किंग कोब्रा मारला गेला. पण त्याच्या चाव्यामुळे एका कुत्र्याला आपला जीवही गमवावा लागला. तर, दुसरा कुत्रा मृत्यूशी झुंज देत आहे.
छत्तीसगड येथील मुंगेली जिल्ह्यातील पिंडारा कंपा भागात ही घटना घडली. या परिसरात राहणाऱ्या श्रीकांत गोवर्धन यांच्या घरात दोन कुत्रे होते. त्यातील एकाचे नाव चिकू असे होते, जे पांढऱ्या रंगाचे लॅब्राडोर होते. तर, दुसऱ्याचे नाव पीकू असे आहे, जे काळ्या रंगाच्या रॉटवेलर प्रजातीचे आहे. सोमवारी रात्री दोन्ही पाळीव कुत्रे अंगणात असताना अचानक एक विषारी किंग कोब्रा साप घरात घुसला. मालकाच्या कुटुंबाला धोका असल्याचे लक्षात येताच त्यांनी विषारी सापा तिथून पळवून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कुत्र्यांनी सापावर हल्ला केला. धोका ओळखून सापानेही त्यांना दंश केला.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दीड मिनिटांचा आहे. या व्हिडिओत दोन कुत्रे सापाशी लढताना दिसत आहेत. दोघेही जीवाची पर्वा न करता त्या सापाला मारण्याचा प्रयत्न करत राहिले. अखेर या जीवघेण्या लढाईत पांढऱ्या रंगाच्या चिकूचा मृत्यू झाला.
या तिघांमध्ये हे प्राणघातक भांडण सुरू असताना गोवर्धन कुटुंबातील लोक शांत झोपले होते. पण दोन कुत्र्यांचा सतत भुंकण्याचा आवाज ऐकून त्याला जाग आली, त्यानंतर त्याने बाहेर येऊन पाहिले. बाहेर आल्यावर अंगणात एक मृत साप पडलेला दिसला, त्याची लॅब्राडोर प्रजातीची चिकूही जवळच बेशुद्धावस्थेत पडलेला दिसला. त्यांनी चिकूला उठवण्याचा प्रयत्न केलाअसता त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तर, त्यांचा दुसरा कुत्रा पिकू जिवंत होता, पण त्याची प्रकृतीही चिंताजनक आहे.
दोन्ही कुत्र्यांनी आपला जीव धोक्यात घालून विषारी कोब्रापासून मालक आणि त्याच्या कुटुंबाचा जीव वाचवला. या घटनेच्या व्हिडिओमध्ये या तिघांमधील हे धोकादायक आणि जीवघेण्या युद्ध दिसत आहे. मृत चिकू अडीच वर्षांचा होता, तर पिकू दोन वर्षांचा आहे. जखमी पिकूवर सध्या उपचार सुरू आहेत.
संबंधित बातम्या