ब्रिटनमध्ये ४ जुलै रोजी झालेल्या संसदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पार्टीला दारुण पराभवाला सामोर जावे लागले आहे. आत्तापर्यंत आलेल्या निकालांमध्ये विरोधी पक्ष असलेला लेबर पार्टीला ४१२ जागांवर विजय मिळाला असून कन्झर्व्हेटिव्ह पार्टीला १२१ जागांवर विजय मिळाला आहे. तर लिबरल डेमोक्रेट पक्षाला ७१ आणि ब्रिटनमध्ये तब्बल १४ वर्ष सत्तेत असलेला कन्झर्व्हेटिव्ह पक्ष सत्तेबाहेर फेकला जाईल असा अंदाज एक्झिट पोलद्वारे व्यक्त करण्यात आला होता. लेबर पार्टीचे नेते, विरोधी पक्षनेते कीर स्टार्मर हे आता ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहे. या निवडणुकीत स्टार्मर यांनी लेबर पार्टीच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले होते. ब्रिटनच्या संसदेत एकूण ६५० जागा असून कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत प्रस्थापित करण्यासाठी ३२६ जागा जिंकण्याची आवश्यकता असते.
सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा गेल्या दोन वर्षांचा कारभार आणि उलथापालथ पाहता यादरम्यान अनेक वाद निर्माण झाले होते. त्यात पंतप्रधानांची तडकाफडकी बदलने असो, ब्रिटनची ढासळलेली अर्थव्यवस्था आणि कोव्हिड-१९ साथीचे ढिसाळ व्यवस्थापन हे निवडणुकीतील प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे ठरले होते. मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव होण्यासाठी हे मुद्दे कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते.
संबंधित बातम्या