मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kuwait Fire : कुवैतच्या भीषण आगीत मुंबईतील कामगाराचा मृत्यू; कुवेतमधून ४५ भारतीयांचे मृतदेह देशात पोहोचले

Kuwait Fire : कुवैतच्या भीषण आगीत मुंबईतील कामगाराचा मृत्यू; कुवेतमधून ४५ भारतीयांचे मृतदेह देशात पोहोचले

Jun 15, 2024 09:11 AM IST

Kuwait Fire : कुवैतच्या दक्षिण भागातील मंगफ परिसरातील इमारतीला नुकत्याच लागलेल्या भीषण आगीत ४५ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या भारतीयांचे मृतदेह हवाई दलाच्या एक विशेष विमानाने भारतात आणणण्यात आले. यात मुंबईच्या एका नगरिकाचा देखील समावेश आहे.

कुवैतच्या भीषण आगीत मुंबईतील कामगाराचा मृत्यू; कुवेतमधून ४५ भारतीयांचे मृतदेह देशात पोहोचले
कुवैतच्या भीषण आगीत मुंबईतील कामगाराचा मृत्यू; कुवेतमधून ४५ भारतीयांचे मृतदेह देशात पोहोचले

Kuwait Fire : कुवैतच्या दक्षिण भागातील मंगफ परिसरातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तब्बल ४५ भारतीयांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह हवाई दलाच्या विशेष विमानाने शुक्रवारी देशात आणण्यात आले. या मृत व्यक्तिमध्ये महाराष्ट्रातील मुंबई येथील मालाड (पश्चिम) येथील रहिवासी डेनी बेबी करुणाकरण यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह आज त्यांच्या नातेवाईकांना दिला जाणार आहे.

कुवैत येथील भीषण दुर्घटनेप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुख: व्यक्त केले आहे. त्यांनी पंतप्रधान मदत निधी म्हणून मृतांच्या कुटुंबीयांना निधी देखील जाहीर केला आहे. दरम्यान, शुक्रवारी सर्व भारतीयांचे मृतदेह भारतीय हवाई दलाच्या सी १३० जे या विशेष विमानाने हे कुवैतहून भारतात आणले गेले. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाचे आगमन झाले. मृतांमध्ये केरळमधील २३, तामिळनाडूतील ७, आंध्र प्रदेशातील ३ जणांचा समावेश आहे. मृतांपैकी ३० जणांचे मृतदेह कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर संबंधित राज्य शासनाकडे सुपुर्द करण्यात आले. तर इतर मृतदेहांना नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या सी १३० जे या विमानाने आणले गेले.

ट्रेंडिंग न्यूज

बुधवारी झाली होती दुर्घटना

बुधवारी पहाटे साडेचार वाजता कुवैतमध्ये एका इमारतीच्या लेबर कॅम्पच्या स्वयंपाकघरातून ही आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागली. ही भीषण आग लागल्यानंतर काही लोकांनी अपार्टमेंटमधून उड्या मारल्या. यामुळे देखील काही नागरिकांचा मृत्यू झाला. तर काहीजण आगीत होरपळून व धुरामुळे गुदमरून मृत्युमुखी पडले. कुवैतमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली.

महाराष्ट्रातील मुंबईतील एका कामगाराचा मृत्यू

या दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील एका कामगाराचा समावेश आहे. मुंबईच्या मालाड (पश्चिम), मालवणी येथील ३३ वर्षीय डेनी बेबी जे गेल्या चार वर्षांपासून कुवैतमधील एका खाजगी कंपनीत अकाउंटंट आणि सेल्स समन्वयक म्हणून काम करत होते.

भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेती अधिकारी सतत संपर्कात असून, या दुर्घटनेत जखमी झालेल्या ५० हून अधिक भारतीयांवर उपचार सुरु आहेत. तसेच, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिंचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात येणार आहे. मालाड येथील डेनी बेबी करुणाकरण यांचा मृतदेह दिल्ली येथून रात्री ११.४० वाजता ६ ई ५१९ या विमानाद्वारे मुंबई येथे पाठविण्यात येईल. हे विमान शनिवारी पहाटे १.४० वाजता मुंबई येथे पोहचले. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी कुवैत येथील घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करून आवश्यक समन्वय साधत या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावली आहे.

महाराष्ट्रातील डेनी बेबी करूणाकरण यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुखरूप पोहचविण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली राजशिष्टाचार अधिकारी किशोर कनौजिया यांनी मोठी भूमिका बजावली.

पंतप्रधान मोदींनी केली २ लाखांची मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत पावलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यांनी पीडित कुटुंबांना शक्य त्या सर्व प्रकारची मदत दिली जाईल असे आश्वासन दिले आहे.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर