कुटूंबातील चौघांच्या एकाच वेळी जळाल्या चिता; वडिलांचा गळा चिरला, आईची हत्या व पत्नीला विष देऊन स्वत: संपवले जीवन
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कुटूंबातील चौघांच्या एकाच वेळी जळाल्या चिता; वडिलांचा गळा चिरला, आईची हत्या व पत्नीला विष देऊन स्वत: संपवले जीवन

कुटूंबातील चौघांच्या एकाच वेळी जळाल्या चिता; वडिलांचा गळा चिरला, आईची हत्या व पत्नीला विष देऊन स्वत: संपवले जीवन

Dec 10, 2024 12:18 PM IST

Family Massacre : ४० वर्षीय आरोपीने आधी वडिलांची गळा चिरून हत्या केली, मग आईचा गळा दाबला, पत्नीला विष प्यायला दिले आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली.

कुटूंबातील चौघांच्या एकाच वेळी जळाल्या चिता
कुटूंबातील चौघांच्या एकाच वेळी जळाल्या चिता

हरियाणातील कुरुक्षेत्र येथे एकाच कुटूंबातील चार जणांच्या हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. कुरुक्षेत्रातील यारा गावात काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील जार जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. घरात शिरुन कोणीतरी या चौघांची हत्या केल्याचा संशय होता. परंतु पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ४० वर्षीय आरोपीने आधी वडिलांची गळा चिरून हत्या केली, मग आईचा गळा दाबला, पत्नीला विष प्यायला दिले आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. या आरोपीने त्याच्या मुलावरही हल्ला केला होता परंतु तो थोडक्यात बचावला आहे. चार ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

शाहाबाद कोर्टात शिपाई पदावर कार्यरत दुष्यंत (वय ४०) याने शुक्रवारी रात्री वडील नैब सिंह (वय ५५) यांची गळी चिरून, आई अमृत कौर (५०) आणि पत्नी अमनप्रीत कौर (३२) यांची हत्या करून मुलगा केशव (१३) यालाही गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत: विष प्राशन केले. रुग्णालयात नेताना त्याचाही मृत्यू झाला तर केशववर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

यारा गावातील नैब सिंह यांच्या कुटूंबातील चार जणांच्या एकाच वेळी चिता जळताना पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. आसपासाच्या गावातील अनेक लोक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते. यावेळी संपूर्ण गावात स्मशान शांतता होती. शाहाबाद कोर्टातील दोन्ही न्यायाधीश आणि आमदार रामकरण कालाही अंतिम संस्कारासाठी उपस्थित होते.

दुष्यंत याने पैशाच्या व्यवहारातून काही लोकांकडून येत असलेल्या धमक्यांना कंचाळून हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दुष्यंत याचा चुलत भाऊ साहिल याच्या तक्रारीवरून बुहावा गावातील विक्रम, सोनीपत येथील संदीप आणि कोमल तसेच त्यांचे नातेवाईक चंद्रभान व सलिंद्र सह ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

काही सामान मागवायचे आहे, त्यामुळे पाच हजार रुपये टाकले -

साहिलने पोलिसांना सांगितले की, रविवारी सकाळी सात वाजता त्याच्या खात्यात चुलत्याच्या फोनवरून ५००० रुपये ऑनलाइन ट्रान्सफर झाले होते. यानंतर त्याने चुलते नैब सिंह यांना फोन केला. मात्र फोन बंद येत होता. त्याने भाऊ दुष्यंतला फोन करून विचारले की, ५००० रुपये कशासाठी पाठवले आहेत. त्यावर दुष्यंत म्हणाला की, आज तुला काही सामान आणायचे आहे. साहिल घरी घेल्यानंतर नैब सिंह यांचा गळा चिरला होता. वरच्या मजल्यावर दुष्यंत व त्याची पत्नी अमनप्रीत कौर व बेटा केशव बेशुद्ध पडले होते. तिघांना रुग्णालयात दाखल केले.

दुष्यंत एक सुसाइड नोट ठेवली असून यामध्ये ८ लोकांवर जीवे मारण्याची धमकी देणे, त्रास देण्याचा आरोप केला आहे. याला कंटाळून त्याने आपल्या कुटुंबाला संपवले. त्याने सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे की, पैसे दिल्यानंतरही आरोपी त्याच्याकडे पैशाची मागणी करत होते. पंचायतीत निकाल दिल्यानंतरही त्यांच्याकडून त्रास दिला जात होता. 

वडिलांची गळा चिरून हत्या, आईच्या डोक्यावर वार -

फॉरेंसिक विशेषज्ञ डॉ. गौरव यांनी सांगितले की, नैब सिंह यांच्या गळ्यावर व्रण होते. धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरला होता. तर अमृतकौर यांच्या डोक्यावर वजनदार वस्तूने वार केला हात. अमनप्रीत कौर यांना विष दिले होते तर दुष्यंतने सल्फास पिऊन आत्महत्या केली होती. 

नॅब कुटूंबाचा एकमेव वारस केशव सुखरुप -

या हत्याकांडातून वाचलेला नॅब सिंह यांचा नातू केशववर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केशववा घटनेबाबत माहिती देण्यात आलेली नाही. संपूर्ण गाव केशवच्या सुखरुपतेसाठी प्रार्थना करत आहे. सर्वांना विश्वास आहे की, कुटूंबाचा वंश पुढेही चालत राहील. दुष्यंत नॅब सिंह यांचा एकुलता एक मुलगा होता तर मृत दुष्यंतलाही एकच मुलगा केशव आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर