मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kuno National Park Cheetah: कुनोतून आली गुड न्यूज! मादी चित्ता ज्वालाने दिला २ पिल्लांना जन्म

Kuno National Park Cheetah: कुनोतून आली गुड न्यूज! मादी चित्ता ज्वालाने दिला २ पिल्लांना जन्म

Jan 23, 2024 11:06 AM IST

Kuno National Park Cheetah : नामिबियातून भारतात आणलेल्या ज्वाला या मादी चित्ताने कुनो नॅशनल पार्कमध्ये ३ पिल्लांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी या पिल्लांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

cheetah named jwala has given birth to three cubs
cheetah named jwala has given birth to three cubs

cheetah named jwala has given birth to three cubs : कुनो नॅशनल पार्क येथून आनंदाची बातमी आली आहे. देशातील चित्तांचा अधिवास असलेल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून भारतात आणलेल्या ज्वाला या मादी चित्ताने ३ गोंडस पिल्लांना जन्म दिला आहे. कुनोच्या वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार, नव्याने जन्मलेल्या पिल्लांची प्रकृती ठीक आहे. त्यांची काळजी घेतली जात आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी या पिल्लांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी मादी चित्ता आशा हिनेही ३ पिल्लांना जन्म दिला होता.

जालना, बीड, नगर ओलांडून मनोज जरांगे पाटलांसह मराठा वादळ पुण्यात धडकले!

मिळालेल्या माहितीनुसार, याआधी मार्च २०२३ मध्ये मादी चित्ता ज्वालाने चार शावकांना जन्म दिला होता. मात्र यातील एकच पिल्लू हे जिवंत राहू शकले. त्यानंतर कुनो व्यवस्थापनाने शावकांच्या मृत्यूचे कारण तीव्र उष्णता असल्याचे सांगितले होते. ज्वाला ही पूर्वी शिया नावाने ओळखली जात होती, नंतर तिचे नाव 'ज्वाला' ठेवण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Fire : पोटमाळ्यावर झोपले अन् आगीत होरपळले; दोघे सख्ख्ये भावंड ठार! पुण्यात चार ते पाच ठिकाणी अग्नितांडव

कुनो नॅशनल पार्कमध्ये गेल्या महिनाभरात आतापर्यंत ६ पिल्ले जन्माला आली आहेत. नामिबियातील ज्वाला या मादी चित्तेने ३ पिल्लांना जन्म दिला आहे. तर, नुकतीच मादी चित्ता आशा हिनेही ३ जानेवारी रोजी ३ पिल्लांना जन्म दिला होता. हे सर्व चित्ते निरोगी असून केएनपी टीम त्यांची विशेष काळजी घेत आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये आता हळूहळू चित्त्यांची संख्या वाढत आहे.

पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, 'कुनोचे नवे शावक, ज्वाला नावाच्या नामिबियन चितेने तीन शावकांना जन्म दिला आहे, नामिबियन चित्ता आशाने तिच्या पिल्लांना जन्म दिल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांनंतर ही आणखी एक आनंदाची बातमी आहे. सर्व वन्यजीव वन्यजीव प्रेमींना हार्दिक शुभेच्छा. भारतामध्ये वन्यजीवांची अशाच प्रकारे भरभराट होत राहिली पाहिजे. चीता प्रकल्प यशस्वी होवो."

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर