सॅलरी चोरणारी साडीवाली दीदी आली; कुणाल कामरा याने शिंदेंनंतर निर्मला सीतारामण यांच्यावर बनवला VIDEO
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सॅलरी चोरणारी साडीवाली दीदी आली; कुणाल कामरा याने शिंदेंनंतर निर्मला सीतारामण यांच्यावर बनवला VIDEO

सॅलरी चोरणारी साडीवाली दीदी आली; कुणाल कामरा याने शिंदेंनंतर निर्मला सीतारामण यांच्यावर बनवला VIDEO

Updated Mar 26, 2025 03:35 PM IST

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याने बुधवारी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तो एका गाण्याच्या माध्यमातून अर्थमंत्र्यांना 'निर्मला ताई' म्हणताना दिसत आहे.

कुमाल कामरा
कुमाल कामरा (HT_PRINT)

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याने बुधवारी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तो एका गाण्याच्या माध्यमातून अर्थमंत्र्यांना 'निर्मला ताई' म्हणत आहे आणि धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद चिघळला असतानाच कामराचा दुसरा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दीड मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये कामरा गंमतीने म्हणतो,

''आपका टैक्स का पैसा हो रहा है हवा हवाई।

इन सड़कों की बर्बादी करने सरकार है आई।

मेट्रो है इनके मन में खोद कर कर लें अंगड़ाई।

ट्रैफिक बढ़ाने ये है आई, ब्रिजेस गिराने ये है आई।

कहते हैं इसको तानाशाही।'

तो पुढे म्हणाले, "... सरकारसोबत देशात एवढी महागाई आली आहे. साडी वाली दीदी लोकांना लुटण्यासाठी आली आहे. पगार चोरण्यासाठी ही आली आहे. मध्यमवर्गीयांना दाबण्यासाठी आली आहे. पॉपकॉर्न चारण्यासाठी आली आहे, तिला म्हणतात निर्मला ताई .

मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी कामरा यांना पोलिसांनी पुन्हा समन्स बजावले आहे. तत्पूर्वी मंगळवारी त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. रविवारी एका कार्यक्रमात त्यांनी नाव न घेता गद्दार', 'ठाण्याची रिक्षा' अशी टीका केली. शिवसेनेकडूनही त्यांना धमक्या दिल्या जात आहेत.

या कार्यक्रमानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण एक मर्यादा असावी. कोणत्याही तोडफोडीचे आपण समर्थन करत नाही, मात्र क्रियेला प्रतिक्रिया असणारच.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर