कोलकाता पुन्हा हादरले! आरजी कर मेडिकल कॉलेजमधील MBBS च्या विद्यार्थीनीचा गळफास घेतलेल्या असवस्थेत आढळला मृतदेह
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कोलकाता पुन्हा हादरले! आरजी कर मेडिकल कॉलेजमधील MBBS च्या विद्यार्थीनीचा गळफास घेतलेल्या असवस्थेत आढळला मृतदेह

कोलकाता पुन्हा हादरले! आरजी कर मेडिकल कॉलेजमधील MBBS च्या विद्यार्थीनीचा गळफास घेतलेल्या असवस्थेत आढळला मृतदेह

Feb 03, 2025 06:50 AM IST

kolkata rg kar medical college : कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमधील आणखी एका महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. एका २० वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

आरजी कर मेडिकल कॉलेजमधील MBBS च्या विद्यार्थीनीचा गळफास घेतलेल्या असवस्थेत आढळला मृतदेह
आरजी कर मेडिकल कॉलेजमधील MBBS च्या विद्यार्थीनीचा गळफास घेतलेल्या असवस्थेत आढळला मृतदेह (HT_PRINT)

kolkata rg kar medical college : कोलकात्यामधील  आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी २० वर्षीय विद्यार्थीनी कामरहाटी ईएसआय हॉस्पिटलच्या क्वार्टरमध्ये तिच्या खोलीत गळफास घेऊन मृतावस्थेत आढळली.  या मुलीची आई इथे डॉक्टर म्हणून काम करते. तिचे वडील, मुंबईत राष्ट्रीयकृत बँकेत वरिष्ठ अधिकारी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईव्ही प्रसाद हिचा मृतदेह शुक्रवारी रात्री छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ती तिच्या खोलीत एकटीच होती.

 मृत मुलगी ही तिच्या आई सोबत राहत होती. तिची आई घरी आली तेव्हा तिने मुलीचा मृतदेह पाहिला. त्यानंतर तिने शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतमुलगी ही  नैराश्यात होती. त्यामुळे त्याने आत्महत्या केली. मात्र, या प्रकरणी घातपाताची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, घटनेच्या रात्री मुलगी आपल्या खोलीत एकटीच होती. तिची आई जेव्हा तिच्या खोलीजवळ पोहोचली तेव्हा तिने दरवाजा वाजवला. मात्र, यातून काही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे तिने शेजऱ्यांच्या मदतीने  दरवाजा तोडून उघडला असता तिला तिची  मुलगी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. आईने शेजाऱ्यांच्या मदतीने मुलीचा मृतदेह खाली  उतरवला व तातडीने  जवळच्या कामरहाटी येथील ईएसआय रुग्णालयात दाखल तिला  केले. मात्र,  डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

याप्रकरणी कामरहाटी पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. खोलीत कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. याबाबत पोलिसांकडून कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आले नसले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी दीर्घ आजाराने ग्रस्त होती, ज्यामुळे तिचे मानसिक आरोग्य बिघडले होते.

आरोपीला फाशीची शिक्षा 

कोलकात्याचे आरजी कर मेडिकल कॉलेज गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.  विद्यार्थिनीसोबत घडलेल्या या घटनेनंतर  विद्यार्थ्यांनी तीव्र निषेध करत डॉक्टरच्या सुरक्षेचा  आणि रुग्णालय प्रशासनाविरोधात आवाज उठवला होता.  त्यानंतर  सरकारने वाटाघाटीकरून त्यांचे आंदोलन स्थगित केले होते.  तसेच या प्रकरणी आरोपी रॉयला बलात्कार आणि हत्ये प्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र, फाशीच्या शिक्षेसाठी राज्य सरकार आणि सीबीआय सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर