कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी सीबीआय आरोपी संजय रॉय याची पॉलीग्राफ चाचणी करणार आहे. त्याला मंजुरी मिळाली आहे. दरम्यान या चाचणीची तारीख अजून ठरली नाही. दरम्यान, संजय रॉय बाबत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संजय रॉय घटना घडलेल्या रात्री (८ ऑगस्ट) रेड लाइट एरियात गेला होता. तेथे त्याने दारू प्राशन केली होती.
रिपोर्टनुसार आरोपी संजय रॉय आपल्या एका साथीदारासोबत ८ ऑगस्टच्या रात्री सोनागाछी परिसरात गेला होता. जो उत्तर कोलकातामधील रेड लाइट एरिया आहे. यावेळी त्याने खूप दारू प्यायली होती. त्याचा मित्र एका वेश्येच्या घरी गेला मात्र तो बाहेरच उभा होता. सूत्रांनी सांगितले की, रात्री २ वाजण्याच्या सुमारास दक्षिण कोलकातामधील चेतला येथील रेड लाइट एरियामध्येही गेला होता. त्यावेळी त्याने तेथे एका महिलेची छेडही काढली होती. त्याने एका महिलेला फोन करून तिला न्यूड फोटो पाठवण्यास सांगितले होते. दरम्यान रॉयच्या मित्राने भाड्याने बाईक घेतली व तो घरी गेला.
संजय रॉय पहाटे जवळपास ३.५० वाजता आरजी कर रुग्णालयात गेला. त्यावेळी तो ट्रॉमा यूनिटच्या जवळ लपून राहल्याचे कोणीतरी पाहिले होते. दारुच्या नशेत तो ऑपरेशन थियेटरचा दरवाजा तोडून आतमध्ये घुसला. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलच्या इमरजन्सी विंगमध्ये पोहोटला व थेट तिसऱ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये गेला. पोलिसांच्या चौकशीत संजय याने कबूल केले आहे की, तेथे ट्रेनी डॉक्टर झोपली होती. त्याने तिला पाहिल्यावर त्याने तिच्यावर हल्ला केला. तिच्यावर बलात्कार करून ठार केले.
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय ची पॉलीग्राफ चाचणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) मंगळवारी, २० ऑगस्ट रोजी करण्याची शक्यता आहे. आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ९ ऑगस्ट रोजी ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीची चाचणी करण्याची परवानगी सीबीआयला सोमवारी देण्यात आली.
आरोपीची मनोविश्लेषण चाचणी केल्यानंतर काही दिवसांनी सीबीआय कोर्टाने आरोपीची पॉलीग्राफ चाचणी करण्यास परवानगी दिली. या प्रकरणातील आरोपींचा सहभाग निश्चित करण्यासाठी पॉलीग्राफ चाचणी घेण्यात येणार आहे.
आतापर्यंत सीबीआयच्या चौकशीत संजय रॉय यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणाचाही सहभाग आढळून आला नाही, त्यामुळे ते एकमेव आरोपी ठरले आहेत. दरम्यान, पीडितेच्या आई-वडिलांनी हा सामूहिक बलात्कार असल्याचा आरोप केला असून रुग्णालयातील अनेक जणांचा यात सहभाग असल्याचा दावा केला आहे.