महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात कुरुंदवाड येथे जन्मलेले आणि सध्या अमेरिकेतील विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेले डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांना खगोलशास्त्रातील प्रतिष्ठेचा ‘शॉ पुरस्कार’ जाहीर झाला आहे. प्राध्यापक श्रीनिवास कुलकर्णी यांना मिलिसेकंद पल्सर, गॅमा-किरण फुटणे, सुपरनोव्हा आणि इतर परिवर्तनशील किंवा क्षणिक खगोलीय वस्तूंविषयी केलेल्या अभूतपूर्व संशोधनासाठी खगोलशास्त्रातील प्रतिष्ठेचा शॉ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कुलकर्णी हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि खगोलशास्त्र विभागात कार्यरत आहेत. कुलकर्णी यांच्यासमवेत अमेरिकेतील स्वी ले थीन आणि प्रा. स्टुअर्ट ऑर्किन (लाइफ सायन्स) आणि पीटर सरनाक (गणित) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
खगोलशास्त्र, जीवन विज्ञान व वैद्यकशास्त्र आणि गणित या तीन विषयातील उत्कृष्ट संशोधकांना दरवर्षी शॉ पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे हे २१ वे वर्ष असून मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी हाँगकाँग येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, असे शॉ पुरस्कार फाऊंडेशनने म्हटले आहे.
हे वाचाः Marathi in USA : अमेरिकेत मराठी वैज्ञानिकाचा झेंडा; बायडेननी केलं अशोक गाडगीळ यांचं तोंड भरून कौतुक
श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९५६ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड या गावी झाला. त्यांचे शिक्षण कर्नाटकातील हुबळी येथे झाले. कुलकर्णी यांचे वडील हुबळी येथे डॉक्टर म्हणून कार्यरत होते. कुलकर्णी यांनी १९७८ साली त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्लीमधून भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर अमेरिकेतील बर्कले विद्यापीठातून त्यांनी पीएचडीचे शिक्षण घेतले. १९८७ पासून ते कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कुलकर्णी यांनी अमेरिकेतील सॅन दिएगो येथील कॅलटेक ऑप्टिकल ऑब्जर्व्हेटरीजचे संचालक म्हणून २००६ ते २०१८ या काळात काम केले आहे. प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती या श्रीनिवास कुलकर्णी यांच्या भगिनी आहेत. सुधा मूर्ती या इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत.
हे वाचाः Sudha Murty to Rajya Sabha: लेखिका सुधा मूर्ती राज्यसभेच्या खासदार; राष्ट्रपतींनी केलं नामनिर्देशित
हाँगकाँगस्थित चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले रन रन शॉ (१९०७-२०१४) यांनी हाँगकाँग येथे ‘शॉ फाउंडेशन’ आणि ‘सर रन शॉ चॅरिटेबल ट्रस्ट’ या दोन चॅरिटेबल संस्थांची स्थापना केली होती. या दोन्ही संस्था जगभरात शिक्षण, तंत्र शिक्षण, विज्ञान, वैद्यकीय क्षेत्रातील मूलभूत संशोधन तसेच जनकल्याणकारी सेवा, संस्कृती आणि कला यांच्या प्रचाराचे कार्य करत असल्याचे शॉ प्राइजच्या वेबसाइटवर म्हटले आहे.
हे वाचाः Parenting Tips: सुधा मूर्ती यांनी सांगितलेल्या पॅरेंटिंग टिप्स आवर्जून करा फॉलो!
संबंधित बातम्या