मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  EV News : 'या' कार कंपनीने आणली आपली ५० हजारावी ईव्ही, इतरांच्या तुलनेत घेतली मोठी आघाडी

EV News : 'या' कार कंपनीने आणली आपली ५० हजारावी ईव्ही, इतरांच्या तुलनेत घेतली मोठी आघाडी

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Nov 08, 2022 01:08 PM IST

Known Motor Production Company Set New Milestone Of 50 Thousand Unit Of EV : भारतातील आघाडीची ऑटोमोटिव्ह कंपनी टाटा मोटर्सने देशातलं ५० हजारावं इलेक्ट्रिक वाहन आणलं आहे, जी टाटा मोटर्ससाठी एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. कंपनीने ७ नोव्हेंबर रोजी पुण्यातील प्लांटमधून ५० हजारावे इलेक्ट्रिक वाहन लॉन्च केले आहे.

टाटा मोटर्स ईव्ही
टाटा मोटर्स ईव्ही (हिंदुस्तान टाइम्स)

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे.देशभरातील ग्राहकांनी ईव्ही क्रांतीचा स्वीकार केला आहे.त्याच वेळी, ईव्ही ग्राहकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, टाटा मोटर्स वेगाने इलेक्ट्रिक वाहने तयार करत आहे. भारतातील आघाडीची ऑटोमोटिव्ह कंपनी टाटा मोटर्सने देशातलं आपलं ५० हजारावं इलेक्ट्रिक वाहन आणलं आहे, टाटा मोटर्ससाठी एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. कंपनीने ७ नोव्हेंबर रोजी पुण्यातील प्लांटमधून ५० हजारावे इलेक्ट्रिक वाहन लॉन्च केले आहे.

इंधनाच्या वाढत्या किमती आणि वाढत्या प्रदूषणाच्या समस्या या दोन्हीपासून मुक्त होण्यास इलेक्ट्रिक वाहने मदत करतात. टाटा मोटर्सकडे सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे. Tata Motors ने भारतातील सर्वात लोकप्रिय SUV ब्रँड Nexon EV पासून ते परवडणारी आणि देशातील पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक, Tata Tiago EV ऑफर केली आहे.

परवडणारी ईव्ही ८ लाख ४९ हजारात लाँच

EV ग्राहकांसाठी, कंपनीने काही दिवसांपूर्वी आपली स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च केली होती, ज्याची किंमत ८ लाख ४९ हजार रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. कंपनीने मल्टी मोड रिजन आणि मल्टी ड्राईव्ह मोड यासारखे फीचर्स तर दिले आहेतच. पण ग्राहकांच्या सुरक्षिततेचीही पूर्ण काळजी घेतली आहे. टाटाची सर्व इलेक्ट्रिक वाहने उच्च व्होल्टेज झिप्टट्रॉन आर्किटेक्चरद्वारे चालविली जातात.

आगामी पाच वर्षात १० इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याची योजना

टाटा मोटर्सने विद्यमान ईव्ही ग्राहकांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स देखील सादर केले आहेत जेणेकरुन ते नवीन मार्गाने ड्रायव्हिंग आणि ऑनर एक्सपीरियंसचा आनंद घेऊ शकतील.याशिवाय टाटा मोटर्सने ८० नवीन शहरांमध्ये प्रवेश केला आहे जेणेकरून लोकांपर्यंत ईव्ही सहज उपलब्ध होईल.आमचे नेटवर्क १६५ हून अधिक शहरांमध्ये विस्तारल्याने अधिकाधिक ग्राहकांना EVs स्वीकारण्यास मदत झाली आहे.टाटा मोटर्स पुढील ५ वर्षांत १० इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या