Delhi Farmer protest : सरकारची आणि शेतकऱ्यांची किमान आधारभूत किमीतीवरुन सुरू असलेली चर्चा ही फिस्कटली आहे. त्यामुळे आज शेतकरी पुन्हा दिललीवर धडकणार आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुन्हा दिल्ली सीमेवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हरियाणाच्या सिंघू, टिकरी आणि धासा सीमा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. येथे सुरक्षेचे सात थर देण्यात आले असून त्यात लोखंडी आणि सिमेंटचे बॅरिकेड्स, कंटेनर आणि अगदी क्रेनही लावण्यात आल्या आहेत.
सुरक्षा तयारी दरम्यान, दिल्ली पोलिसांनी हरियाणा-पंजाबला जोडणाऱ्या शंभू सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला आहे. हरियाणा पोलिसांची रणनीती समजून घेणे हा त्यामागचा उद्देश होता, जेणेकरून दिल्ली पोलिसांनी सीमावर्ती भागात केलेल्या तयारीत काही ठिकाणी सुरक्षा वाढवण्यास भर देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलिस सज्ज आहे. पोलिसांनी सीमावर्ती भागात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. तर त्यानंतर बॅरिकेड्स लावून कंटेनर उभे केले आहेत. तसेच सुरक्षा कठडे मजबूत करण्यासाठी बॅरिकेडिंगवर लोखंडी तारा लावण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस दल आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.
बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यासोबतच दिल्ली पोलीस ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे आंदोलकांवर लक्ष ठेवून आहेत. २१ फेब्रुवारीला दिल्लीकडे शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याच्या घोषणेनंतर नोएडा पोलीसही सतर्क आहेत. दिल्ली-नोएडा सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. दिल्ली मोर्चात सहभागी होणीचे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे
चिल्ला आणि इतर ठिकाणांहून तपासणी केल्यानंतरच वाहनांना पुढे जाण्यास परवानगी दिली जाईल. संबंधित अधिकारीही घटनास्थळी उपस्थित राहणार आहेत. सीमेवर होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. LIU टीम देखील सक्रिय आहे आणि शेतकऱ्यांशी संबंधित प्रत्येक क्रियाकलापांवर लक्ष ठेवून आहे आणि पुढील अहवाल देत आहे.
बुधवारी सकाळी मध्य जिल्ह्यात वाहतूक पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी ९.३० ते ११.३० वाजेपर्यंत दोन तास आयटीओ चौक, डीडीयू मार्ग, बहादूरशाह जफर मार्ग, जेएलएन मार्ग, शांती वन क्रॉसिंग आणि राजघाट क्रॉसिंगजवळ वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या काळात आयपी मार्गापासून दूर राहण्याचा सल्ला वाहतूक पोलिसांनी दिला आहे.