मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Tipu Sultan Sword : टिपू सुलतानची तलवार भारताला परत मिळणार; ब्रिटन सरकारचा मोठा निर्णय!

Tipu Sultan Sword : टिपू सुलतानची तलवार भारताला परत मिळणार; ब्रिटन सरकारचा मोठा निर्णय!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 22, 2022 04:00 PM IST

Tipu Sultan Sword : भारतातून इंग्लंडमध्ये नेण्यात आलेल्या वस्तू पुन्हा भारत सरकारकडे सोपवण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारनं घेतला आहे. त्यात टिपू सुलतानच्या तलवारीचा समावेश आहे.

Tipu Sultan Sword
Tipu Sultan Sword (HT)

Tipu Sultan Sword : इंग्रजांनी भारतात राज्य करताना देशातून चोरून नेलेली सात शिल्प भारत सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्लासगोतील संग्रहालयात ठेवण्यात आलेले भारतीय शिल्पं आणि कलाकृती भारताला परत करण्याचा निर्णय ब्रिटिश सरकानं घेतला आहे. भारतीय उच्चायुक्तांचं पथक आणि केल्व्हिंग्रोव्ह आर्ट गॅलरीमध्ये एक करार झाल्यानंतर या वस्तू भारताला परत देण्यात येणार आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताला इंग्लंडमधून देण्यात येणारी ही पहिलीच कलाकृती असल्याचं सांगण्यात येत आहे.

याशिवाय यात म्हैसूरचा राजा टिपू सुलतानच्या तलवारीचाही समावेश असल्यानं आता टिपूची तलवार भारतात परत आणली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. ब्रिटनमधून काही कलाकृती आणि शिल्पं कानपूर, कोलकाता, ग्वाल्हेर, बिहार आणि हैदराबाद येथे आणण्यात आली आहे, त्यातल्या काही कलाकृती या एक हजार वर्षे जून्या असल्याचं सांगितलं जात आहे.

दगडी शिल्प आणि टिपूची तलवार भारतात आणली जाणार...

ब्रिटनमधून भारतात परत आणल्या जाणाऱ्या कलाकृतींमध्ये विविध दगडी शिल्प आणि टिपू सुलतानची तलवार आणि म्यानाचाही समावेश आहे. १९ व्या शतकात देशातील विविध मंदिरांतून या कलाकृती चोरून इंग्लंडमध्ये नेण्यात आल्या होत्या, त्यात टिपूच्या तलवारीचाही समावेश होता. परंतु आता त्या भारताला परत देण्यात येणार आहे.

<p><strong>Tipu Sultan</strong></p>
Tipu Sultan (HT)

कोहिनूर हिरा परत मिळणार का?

इंग्रजांनी भारतात १५० वर्षे राज्य केल्यानंतर देशातील अनेक मौल्यवान व महत्त्वपूर्ण वस्तू चोरून इंग्लंडमध्ये नेल्या होत्या, त्यात जगातील सर्वात प्रसिद्ध आणि महागड्या कोहिनूर हिऱ्याचाही समावेश आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवारही इंग्रजांनी चोरून नेलेली आहे. त्यामुळं आता कोहिनूर हिऱ्यासह महाराजांची भवानी तलवार भारताला कधी परत मिळणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

IPL_Entry_Point