Snake Viral Video: साप किती विषारी असतात, हे सर्वांनाच माहीत आहे. साप दिसताच लोक इकडे तिकडे धावायला लागतात. यातच तो साप किंग कोब्रा असेल तर मग अनेकांना घाम फुटतो. जगातील सर्वात विषारी सापपैकी एक असलेल्या या किंग कोब्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यात किंग कोब्रा एका घरातील छताच्या पंख्यावर बसलेला दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये किंग कोब्रा घरातील पंख्यावर बसलेला दिसत आहे. पंखा थोडासाही हलला तरी किंग कोब्रा खाली पडू शकतो. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
किंग कोब्राचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. किंग कोब्रा घराच्या पंख्यावर बसलेला पाहून लोकांची अवस्था बिकट झाली आहे. हा व्हिडिओ ५८ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे. किंग कोब्रा घरातील पंख्यावर कसा जाऊन बसला? असा प्रश्न व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना पडला आहे.
हा व्हिडिओ chandrasekaran6102 नावाच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. बिचारा साप हवा घेण्यासाठी पंख्यावर बसला, असे अनेकांनी गंमतीने लिहिले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या